वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालणं गरजेचं? अजिबात करू नका या चुका...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:28 PM2022-09-07T14:28:34+5:302022-09-07T14:28:55+5:30

Weight Loss Tips : अनेकजण वजन कमी करण्याचा विषय निघाला की, सर्वातआधी जिम जॉईन करण्याचा विचार करतात. पण तिथे वेळी देऊन घाम गाळण्यासाठी इच्छाशक्ती फार चांगली असणे गरजेचे आहे.

Weight Loss Tips : How many steps take daily helpful for weight loss | वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालणं गरजेचं? अजिबात करू नका या चुका...

वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालणं गरजेचं? अजिबात करू नका या चुका...

googlenewsNext

Weight Loss Tips :  वजन कमी करणे ही सध्या जभरातील अनेकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मात्र अनेकजण वजन कमी करण्यासाठी आवश्यक गोष्टींची सुरूवात तर मोठ्या जोशाने करतात, पण नंतर त्यांचा इंटरेस्ट कमी होतो. आणि पुन्हा परिस्थिती जैसे थी होते. इतकं नक्की की, वजन कमी करण्यासाठी अपार इच्छाशक्ती आणि भरपूर मेहनत लागते. 

अनेकजण वजन कमी करण्याचा विषय निघाला की, सर्वातआधी जिम जॉईन करण्याचा विचार करतात. पण तिथे वेळी देऊन घाम गाळण्यासाठी इच्छाशक्ती फार चांगली असणे गरजेचे आहे. मात्र असं नाही की, जिमला गेले नाही तर वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी आणखीही अनेक पर्याय आहेत. त्यातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा आणि सोपा पर्याय म्हणजे वॉकिंग म्हणजेच पायी चालणे. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी पायी चालणे फार महत्त्वाचे आहे. सोबतच याने हृदयासंबंधी आजारांचाही धोका कमी होतो.

चालणे आणि वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी पायी चालणे हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागत नाहीत. तसेच याला वेळीची कोणतीही बंधने नाहीत. तुम्ही सकाळी, दुपारच्या जेवणानंतर आणि डिनरनंतरही चालू शकता. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी म्हणून किती पावले चालावी? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

किती पायी चालावं?

तुम्ही जर नुकतंच वजन कमी करण्यासाठी पायी चालणे सुरू केले असेल तर तुम्ही तुमचं स्वत:चं एक लक्ष्य ठरवा. सुरूवातीला तुम्ही दररजो १० हजार पावले चालू शकता. एकदा तुम्हाला इतकं चालण्याची सवय झाली की, मग तुम्ही हे वाढवा. नंतर तुम्ही १२ हजार, १५ हजार पावले चालू शकता. 

पायी चालण्यासाठी काही टिप्स

जर तुम्ही दिवसभर डेस्क जॉबमध्ये व्यस्त राहत असाल तर तुमच्यासाठी वजन कमी करणे फारच मोठं आव्हान आहे. त्यामुळे कामाच्या अधेमधे छोटे ब्रेक घ्या आणि चालत रहा. तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर कराल तर तुम्हाला चालण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज पडणार नाही. ऑफिस जवळ असेल तर गाडीने जाण्याऐवजी चालत गेले तर तेवढाच फायदा तुमचा. 

वयानुसार कुणी किती पावले चालावी?

एका रिसर्चनुसार, ६ ते १७ वयोगटातील मुलांनी दररोज १५ हजार पावले चालावीत. तर या वयोगटातील मुलींनी १२ हजार पावले चालावीत. तर १८ ते ४० वयोगटातील महिला आणि पुरूषांनी १२ हजार पावले चालावे. ४० ते ५० वयोगटातील महिलांनी दररोज ११ हजार पावले चालले पाहिजे. तर ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पुरूषांनी ११ हजार पावले चालावीत.  
 

Web Title: Weight Loss Tips : How many steps take daily helpful for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.