पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोड पदार्थाचं करा सेवन, मिळेल मिलिंद सोमणसारखी फ्लॅट टमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 09:42 AM2022-12-30T09:42:08+5:302022-12-30T09:42:27+5:30

Jaggery For Weight Loss : सामान्यपणे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांना गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण गोड पदार्थ खाल्ल्यावर आपलं शरीर शुगरला फॅटमध्ये बदलून लठ्ठपणा वाढवतं.

Weight loss Tips : Jaggery water for burning belly fat, know how to prepare it | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोड पदार्थाचं करा सेवन, मिळेल मिलिंद सोमणसारखी फ्लॅट टमी

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोड पदार्थाचं करा सेवन, मिळेल मिलिंद सोमणसारखी फ्लॅट टमी

googlenewsNext

Jaggery For Weight Loss : मिलिंद सोमण 90 च्या दशकातील टॉपचा सुपर मॉडर होता. आजही त्याची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. सध्या त्याचं वय 57 आहे, पण त्याची फीटनेस तरूणांना लाजवेल अशी आहे. जर तुम्हालाही मिलिंद सोमणसारखं फीट दिसायचं असेल तर पोटावरील आणि कंबरेवरील चरबी कमी करावी लागेल. डाएटमध्ये बदल न करता हे काम सोपं नाहीये. यासाठी तुम्हाला गुळाचं सेवन करावं लागेल. 

गूळ खाऊन वजन करा कमी

सामान्यपणे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांना गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण गोड पदार्थ खाल्ल्यावर आपलं शरीर शुगरला फॅटमध्ये बदलून लठ्ठपणा वाढवतं. पण गुळाचं सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता. कारण गूळ हा एक नॅच्युरल स्वीटनर आहे.

गुळाचं पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी गुळाचं पाणी तुमच्या खूप कामात येऊ शकतं. पण याचं सेवन कमी प्रमाणातच करावं लागेल, तेव्हा फॅटवर जोरदार वार होईल. चला जाणून घेऊ कसं तयार करायचं गुळाचं पाणी आणि ते कधी प्यावं.

फायदेशीर तत्व

गुळामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. हे तत्व डायजेशनशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. पचनतंत्र मजबूत राहणं फिटनेससाठी फार महत्वाचं आहे.

गुळाचं पाणी कसं कराल तयार

हे खास पाणी तयार करण्यासाठी 15 ग्रॅम गूळ घ्या आणि तो रात्रभर एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा. सकाळी हे पाणी चाळणीने गाळून घ्या आणि त्याचं सेवन करा. नियमितपणे असं कराल तर याचा प्रभाव हळूहळू दिसायला लागेल.

या गोष्टींची घ्या काळजी

गूळ हा गरम असतो. त्यामुळे याचं सेवन करताना काळजी घ्यावी लागते. प्रेग्नंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळाचं पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने नुकसानही होऊ शकतं.

Web Title: Weight loss Tips : Jaggery water for burning belly fat, know how to prepare it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.