अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? चिंता सोडा; जेवणाच्याआधी फक्त 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा

By Manali.bagul | Published: December 10, 2020 11:47 AM2020-12-10T11:47:19+5:302020-12-10T12:05:17+5:30

Health Tips in Marathi : जसजसे दिवस निघत जातात तसतसं कॅलरीजयुक्त, गोड पदार्थ खाण्यास सुरूवात होते. जास्तीत जास्त लोक हे  रात्रीच्या जेवणात अनहेल्दी  पदार्थांचा समावेश करतात.

Weight Loss Tips Marathi : Follow these 7 simple dinner rules to lose weight | अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? चिंता सोडा; जेवणाच्याआधी फक्त 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा

अनेकदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? चिंता सोडा; जेवणाच्याआधी फक्त 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो  करत असतो. अनेकजण हेल्दी आहार घेऊन दिवसाची सुरूवात करतात.  जसजसे दिवस निघत जातात तसतसं कॅलरीजयुक्त, गोड पदार्थ खाण्यास सुरूवात होते. जास्तीत जास्त लोक हे  रात्रीच्या जेवणात अनहेल्दी  पदार्थांचा समावेश करतात. ओव्हरइटिंगमुळे वजन कमी करणं कठीण होतं. आज आम्ही तुम्हाला जेवणाच्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास वजन कमी होऊ शकतं याबाबत सांगणार आहोत.

१) वजन कमी करण्यासाठी तुम्ही कॅलरीजची एक मर्यादा ठेवायला हवी.  रात्रीच्यावेळी दोन घास कमी खा. ओव्हरइटींग करू नका. जास्तीत जास्त पौष्टीक आणि हलक्या पदार्थांचा  आहारात समावेश करा. 

२) जेवण बनवताना तुम्ही  ज्या तेलाचा वापर करता. त्या तेलात किती प्रमाणात कॅलरीज आहेत. हे आधी पाहून घ्या. जर तुम्ही जास्त तळलेले पदार्थ दुपारच्या आणि रात्रीच्या  जेवणासाठी खात असाल तर तुमचं वजन कधीच  कमी होणार नाही. ऑलिव ऑईल, नारळाचं तेल किंवा कोणतंही तेल असो.  जेवणात  तेलाचे प्रमाण कमीत कमी असायला हवं.

३) रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणा दरम्यान आपण काय आणि किती खाल्ले याचा आपल्या वजनावर परिणाम होतो. जर आपण दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणात खूप गॅप घेत असाल तर जास्त भूक लागल्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जास्त खाणे सुरू कराल. म्हणून संध्याकाळी स्नॅक्स वेळेवर घ्या.

सोफा, खुर्चीपेक्षा जास्त फायदेशीर ठरतं जमिनीवर बसणं; जाणून घ्या 'ही' ४ वैज्ञानिक कारणं

४) अनेकदा पिण्याच्या पाण्याचे महत्व लोकांना कळत नाही. पाणी फक्त आपल्याला हायड्रेटेड ठेवत नाहीत तर आपल्याला आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि कमी खाण्यास मदत करतात. जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी एक मोठा ग्लास भरून पाणी प्या. 

५) अन्न नेहमी शांत मनाने खावे. जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. त्यामुळे आपले पोट कधी भरलेले आहे हे देखील आपल्याला कळत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं जातं. काळजीपूर्वक खाल्ल्याने तुम्ही तुमच्या कॅलरीचे सेवन आरामात करू शकता.

कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

६) झोपायच्या वेळेच्या २ तास आधी रात्रीचे जेवण संपवा. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर ७ वाजतापर्यंत नियमित जेवण करा आणि झोपायला जा. उशिरा जेवल्यानंतर लगेच झोपायला गेल्याने  लोकांचे कधीही वजन कमी  होत नाहीत.

७) एका संशोधनानुसार असे आढळले आहे की इतर कार्बपेक्षा बटाटे जास्त खाल्ल्याने पोट पूर्ण भरले जाते. बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो हा गैरसमज आहे. याउलट, त्यात भरपूर फायबर आणि चांगल्या प्रतीचे कार्ब असतात. आपल्याला फक्त कमी प्रमाणात खाण्याची आवश्यकता आहे.
 

Web Title: Weight Loss Tips Marathi : Follow these 7 simple dinner rules to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.