वजन कमी करण्यासाठी रनिंगची योग्य पद्धत काय असते? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 04:32 PM2022-10-13T16:32:46+5:302022-10-13T16:35:31+5:30

Weight Loss : रनिंग म्हणजेच धावल्याने शरीराच्या अवयवांची एकत्र एक्सरसाइज होते. मात्र, तुम्हीही वजन कमी करण्यासाठी रनिंग करत असाल तर तुम्हाला रनिंगची योग्य पद्धत माहीत असायला हवी.

Weight Loss Tips : Method running quickly reduces weight | वजन कमी करण्यासाठी रनिंगची योग्य पद्धत काय असते? जाणून घ्या...

वजन कमी करण्यासाठी रनिंगची योग्य पद्धत काय असते? जाणून घ्या...

googlenewsNext

Weight Loss : लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी लोक काय-काय करतात हे सर्वांनाच माहीत आहे. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे रनिंग. वजन कमी करण्यासाठी रनिंग हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. रनिंग म्हणजेच धावल्याने शरीराच्या अवयवांची एकत्र एक्सरसाइज होते. मात्र, तुम्हीही वजन कमी करण्यासाठी रनिंग करत असाल तर तुम्हाला रनिंगची योग्य पद्धत माहीत असायला हवी.

रनिंग खासकरून अशा महिलांसाठी अधिक गरजेची असते, ज्या महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. कारण जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा केवळ लठ्ठपणाच कमी होतो, असं नाही तर शरीरही फिट राहतं. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर रनिंगच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रनिंग करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं नुकसानही होऊ शकतं. जर तुम्हीही रोज रनिंग करत असाल तर रनिंगची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिेजे. चला जाणून घेऊ काही टिप्स...

काय करू नये?

जर तुम्ही रनिंग करणं नुकतंच सुरू करत असाल तर जास्त वेगाने रनिंग करणे टाळलं पाहिजे. कारण जर तुम्ही सुरूवातीलाच वेगाने रनिंग करू लागता तेव्हा लवकर थकवा जाणवतो आणि मसल्समध्ये वेदना होत असल्याने अनेकजण रनिंग बंद करतात. जेव्हाही रनिंगसाठी तयारी कराल तेव्हा पहिल्या आठवड्यात हळू रनिंगने सुरूवात करा. त्यासोबतच रनिंग करण्याआधी स्ट्रेचिंग एक्सरसाइज नक्की करावी. वेगाने रनिंग केल्याने तुम्ही लवकर थकाल आणि वजन कमी करण्यासाठी गरजेच्या कॅलरी बर्न होणार नाहीत.

डाएटमध्ये काय घ्यावं?

जर तुम्ही रोज रनिंग करत असाल तर तुम्ही डाएटवरही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही विचार करत असाल तर की, केवळ रनिंग करून वजन कमी कराल तर तुम्ही चुकताय. रनिंगसोबतच आहारात पोषक तत्वांचा समावेश करावा. त्याशिवाय वजन कमी होणार नाही.

तसेच शरीराला जेव्हा आवश्यक पोषण मिळत नाही तेव्हा रनिंगचा फायदा मिळत नाही. त्यामुळे रनिंग करण्याआधी तुमच्या डाएट एक्सपर्टकडून डाएट चार्ट तयार करून घ्या. आहारात प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबरचा समावेश करावा. जर तुम्ही रोज धावत असाल दूध आणि पनीरचा आहारात समावेश करा.

पोश्चरवर द्या लक्ष

रनिंग करतेवेळी तुम्ही पोश्चर योग्य असणं गरजेचं आहे. नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे रनिंग करताना शरीर सरळ आणि नजर समोर असली पाहिजे. तसेच रनिंग करताना पाय जोराने जमिनीवर आपटणे देखील चुकीचे ठरेल. कारण याने जॉइंट्समध्ये समस्या होऊ शकते.

योग्य शूज आणि कपड्यांची निवड

रनिंग सुरू करण्याआधी योग्य शूजची निवड करावी. कारण चुकीचे शूज वापरून तुमच्या मसल्सला जखम होऊ शकते. अनेकदा काही लोक चप्पल किंवा सॅंडल घालून रनिंग करतात. पण चप्पलची पायात व्यवस्थित पकड बसत नाही. त्यामुळे अर्थात व्यवस्थित रनिंग करता येणार नाही. तसेच सैल आणि आरामदायी कपड्यांचा वापर करावा.
 

Web Title: Weight Loss Tips : Method running quickly reduces weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.