वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज करावी का? जाणून घ्या योग्य पद्धत....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:18 PM2022-09-17T12:18:05+5:302022-09-17T12:18:34+5:30
Breakfast weight loss : नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते.
Breakfast weight loss : नाश्ता आणि वेट लॉस वर्कआउट यांचा एकमेकांशी संबंध असतो. ही बाब समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे की, नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. कारण वजन कमी करण्यात नाश्त्याची महत्त्वाची भूमिका असते.
नाश्त्याआधी एक्सरसाइजचे फायदे
रिकाम्या पोटी एक्सरसाइज करण्याचे अनेक फायदे आहेत. बॉथ विश्वविद्यालयात झालेल्या एका शोधानुसार, वजन कमी करण्यासाठी नाश्त्याआधी केली जाणारी एक्सरसाइज जास्त फायदेशीर ठरते.
तसेही तुम्ही नाश्त्याआधी एक्सरसाइज करता तेव्हा शरीरात जमा अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत मिळते. नाश्त्याआधी एक्सरसाइज केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा किंवा त्रासाचा सामना करावा लागत नाही.
नाश्त्यानंतर एक्सरसाइज करण्याचे फायदे
जेव्हा आपण नाश्त्यानंतर एक्सरसाइजबाबत सांगतो तेव्हा समोर येतं की, तुम्हाला कमजोरी जाणवत नाही. जे लोक हार्ड एक्सरसाइज करतात, त्यांना नाश्त्यानंतरच एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यानंतर एक्सरसाइजचे फायदे कमी होतात.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी कधी करावी एक्सरसाइज?
नाश्त्याआधी किंवा नंतर एक्सरसाइज कधी करावी? असाही एक प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्रश्नाचं उत्तर अनेकदा लाइफस्टाईलवर अवलंबून असतं. याबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, व्यक्तीला ज्यावेळी एक्सरसाइज करणं चांगलं वाटतं, त्यावेळी त्यांनी एक्सरसाइज करावी. काही लोकांना नाश्ता करण्याआधी एक्सरसाइज करणं जास्त सोपं वाटतं. तर काही लोकांना नाश्त्यानंतर एक्सरसाइजमध्ये जास्त ऊर्जा जाणवते.
या गोष्टींचीही घ्या काळजी
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नाश्ता केल्यानंतर एक्सरसाइज करायची असेल तर नाश्ता हलका करायला हवा. नाश्ता केल्यानंतर कमीत कमी एक तास कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करणे टाळावे. नाश्ता केल्यावरही स्वत:ला हायड्रेट करण्याचं काम करा.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्ता आणि एक्सरसाइजची योग्य पद्धत महत्वाची असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक्सरसाइज आणि नाश्त्याची निवड करावी.