पोटावरील चरबी लगेच कमी करायची असेल तर डिनरमध्ये खा हे पदार्थ, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:41 AM2022-09-06T11:41:31+5:302022-09-06T11:42:00+5:30
Weight Loss Tips : डिनर हलकं असावं. तेच डिनर झोपण्याच्या 3 तासांआधी घेतलं पाहिजे. ज्याने तुमची झोप पूर्ण होते. मात्र, तुम्ही डिनरमध्ये काही पदार्थांचा समावेश करूनही वजन कमी करू शकता. चला जाणून त्याबाबत...
Weight Loss Tips : प्रत्येकाला वाटत असतं की, ते फीट रहावे. पण शरीराचं वाढल्या कारणाने असं होऊ शकत नाही. वजन वाढल्याने आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वांनाच आपलं वजन कमी करायचं असतं. तेच जेव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा लोक एक्सरसाइज आणि डाएटवर लक्ष देतात. तेच एका चांगल्या डाएटसाठी सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि हेवी असायला हवा. डिनर हलकं असावं. तेच डिनर झोपण्याच्या 3 तासांआधी घेतलं पाहिजे. ज्याने तुमची झोप पूर्ण होते. मात्र, तुम्ही डिनरमध्ये काही पदार्थांचा समावेश करूनही वजन कमी करू शकता. चला जाणून त्याबाबत...
मूग डाळ
पिवळ्या मूग डाळीत अनेक पोषक तत्व असतात. जे तुमचं ब्लड प्रेशर बॅलन्स करण्यात मदत करतात. याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे तुम्ही डिनरमध्ये मूग डाळीचा समावेश करू शकता. मूग डाळीचं पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.
साबूदाना खिचडी
साबूदान्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. साबूदाना खिचडी हे हलकं जेवण असतं. जे तुम्ही उपवासावेळी खाता. पण जर तुम्ही नेहमीच डिनरमध्ये साबूदाना खिडचीचं सेवन कराल तर तुम्हाला लवकर वजन कमी करण्यास मदत मिळेल. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पपईचा सलाद
पपई बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्यांपासून सुटका देते आणि वजन कमी करण्यासही मदत करते. त्यामुळे तुम्ही डिनरमध्ये पपई खाऊ शकता. पपईची खास डिश तयार करण्यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये पपई, गाजर, काकडीचे काही तुकडे टाका. यात सोया सॉस, राइस विनेगर, कांदा, हिरवी मिरची आणि मीठ टाका. हे तयार झालं तुमचं वजन कमी करण्याचा सलाद.