वजन कमी करायचंय असेल तर हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा, तरच होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 06:41 PM2022-08-19T18:41:17+5:302022-08-19T18:47:21+5:30

Weight Loss Tips : खरंतर डाएट करणे म्हणजे खाणे-पिणे सोडणे नाही. तुमच्या शरीराला मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सची गरज असते. आणि हे तत्व तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांमधून या गोष्टी मिळत असतात. 

Weight Loss Tips : Want lose weight stop eating foods containing bad starch | वजन कमी करायचंय असेल तर हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा, तरच होईल फायदा!

वजन कमी करायचंय असेल तर हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा, तरच होईल फायदा!

googlenewsNext

Weight Loss Tips : वजन वाढण्याची समस्या अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. त्यामुळे अनेकजण डायटींगचा आधार घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, डाएट करताना काय खावे काय खाऊ नये. या गैरसमजात अनेकजण उपाशी राहतात. पण खरंतर डाएट करणे म्हणजे खाणे-पिणे सोडणे नाही. तुमच्या शरीराला मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सची गरज असते. आणि हे तत्व तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांमधून या गोष्टी मिळत असतात. 

असे अनेक पदार्थ आहेत ज्यात 'बॅड स्टार्च'चं प्रमाण अधिक असतं. जर हे पदार्थ खाणे तुम्ही टाळले तर तुम्ही तुमचं वजन वेगाने कमी करु शकता. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ तुम्ही खाऊ नये. 

व्हाईट ब्रेड आणि मैद्यापासून तयार पदार्थ

मैद्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ वजन कमी करण्यात सर्वात मोठा अडसर निर्माण करतात. आजकाल ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि फास्टफूड हे मैद्यापासून तयार केलेले असतात. सॅंडविच, व्हाइट ब्रेड, पास्ता, बिस्कीटे, नूडल्स हे मैद्यापासून तयार केलेले असतात. मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या या पदार्थांमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट दोन्ही मोठ्या प्रमाणात असतात. तर फायबर, प्रोटीन आणि इतर पोषक तत्वे कमी असतात. यात शुगरचं प्रमाणही अधिक असतं. 

ब्रेकफास्ट सेरियल

ब्रेकफास्ट सेरियलच्या नावाने मार्केटमध्ये आज कितीतरी खाण्या-पिण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत. या फूड्सबाबत दावा केला जातो की, हे वेगवेगळ्या धान्यांपासून जसे की, कॉर्न, बाजरी, जव, गहू ज्वारी यांपासून तयार केलेले असतात. पण सत्य हे आहे की, हे खाल्याने तुमचं ब्लड शुगर वाढतं. खासकरुन त्या ब्रेकफास्ट फूड्सच्या सेवनाने जे दुधात मिश्रीत करुन खाल्ले जातात. हे पदार्थ धान्यापासून तयार केलेले असतात पण हे धान्य प्रोसेस्ड असतं. त्यामुळे तुम्ही या रेडीमेड फूडऐवजी या धान्याचं सेवन ब्रेकफास्टमध्ये करा. याने तुम्हाला फायदा होईल. 

तांदूळ

दररोज घराघरात तांदूळाचा वापर केला जातो. या तांदूळामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं, ज्याने तुमच्या शरीरातील चरबी वाढते. तसेच भात खाल्याने त्यावेळी तुमचं पोट भरलेलं वाटतं पण काही वेळातच तुम्हाला भूक लागते. आणि अशात तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त कॅलरी खाता. जर वजन कमी करायचं असेल तर पांढरे तांदूळ खाणे बंद करा. त्याजागी ब्राऊन तांदूळ किंवा क्विनोआचा वापर करा. पण हेही कमी प्रमाणातच खावे.

बटाटे

कव्हर काढलेल्या पांढऱ्या बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतात. याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. बटाटे डीप फ्राय करुन त्या बटाट्यांचे पदार्थ जसे की, टिक्की, बर्गर, फ्राइज इत्यादींचं सेवन तुमचं वजन कमी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. त्यामुळे यांचं सेवन आधी बंद करा. जर तुम्हाला बटाटा खायचाच आहे तर त्याच्या सालीसोबतच खावे. बटाटाच्या सालीमध्ये फायबर असतं, ज्याने तुमचं पोट भरलेलं राहतं. 

Web Title: Weight Loss Tips : Want lose weight stop eating foods containing bad starch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.