तुम्ही झोपेतही वजन कमी करु शकता! विश्वास बसत नसेल तर, फॉलो करा या टिप्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 01:25 PM2021-11-12T13:25:00+5:302021-11-12T13:25:11+5:30

काही विशेष टिप्स वापरल्यानंतर तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्यांच्याबद्दल जाणून (Weight Loss Tips) घेऊया.

weight loss tips while you are sleeping | तुम्ही झोपेतही वजन कमी करु शकता! विश्वास बसत नसेल तर, फॉलो करा या टिप्स....

तुम्ही झोपेतही वजन कमी करु शकता! विश्वास बसत नसेल तर, फॉलो करा या टिप्स....

Next

वजन कमी करणं हे अनेकांना खूप अवघड काम वाटतं. पण झोप घेतल्यानं तुमचं वजन कमी होईल, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे खरं आहे की, काही विशेष टिप्स वापरल्यानंतर तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्यांच्याबद्दल जाणून (Weight Loss Tips) घेऊया.

आपण झोपेत असतानाही आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव कार्यरत राहतात. त्यामुळे झोपेच्या वेळी वजन कमी करणे शक्य होते आणि तुमचे शरीर अतिरिक्त चरबी कमी करण्याचे काम करत राहते. त्यामुळे या टिप्सचा अवलंब करून झोपतानाही वजन कमी करता येते.

ग्रीन टी
ग्रीन टीचं सेवन केल्यानं चयापचय गतिमान होते. त्यामुळं झोपेत असतानाही शरीरातील चरबी जळत राहते. दररोज 3 कप ग्रीन टी पिऊन तुम्ही 3.5 टक्के जास्त कॅलरीज बर्न करू शकता.

रात्री व्यायाम
रात्री जड वजनांचा वापर करून व्यायाम केल्यानं झोपेच्या वेळी वजन कमी होऊ शकतं. कारण, व्यायाम केल्यानंतर 16 तास चयापचय जलद राहते आणि शरीर अतिरिक्त चरबीचा ऊर्जा म्हणून वापर करत राहतं.

झोपायच्या आधी केसीन प्रोटीन शेक घेणं
व्यायाम केल्यानंतर झोपण्यापूर्वी केसीन प्रोटीन शेक प्यावा. हा प्रोटीन शेक हळूहळू पचतो आणि रात्रभर चयापचय क्रियाशील ठेवतो. यामुळं शरीर ऊर्जेसाठी स्नायूंऐवजी फक्त चरबी वापरतं.

थंड पाण्यानं आंघोळ करा
तज्ज्ञांच्या मते, शरीरातील ब्राऊन फॅट (Brown Fat) कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं. परंतु शरीरात ब्राऊन फॅट फारच कमी असते, जी खांद्याच्या मागच्या बाजूला आणि मानेवर असते. जर तुम्ही रात्री व्यायाम केल्यानंतर 30 सेकंद थंड पाण्यानं आंघोळ केली तर, ही ब्राऊन फॅट पूर्णपणे सक्रिय होतं आणि तुम्ही जास्त कॅलरीज बर्न करू शकता.

5. अधूनमधून उपवास (इंटरमिटेंट फास्टिंग)
वजन कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास (इंटरमिटेंट फास्टिंग) करणं खूप फायदेशीर आहे. यामध्ये 24 तासांपैकी काही तासांदरम्यानच खावं लागतं आणि उर्वरित तास उपाशी राहावं लागतं. उपवासादरम्यान, शरीर आधीच जमा झालेली साखर आणि चरबी जाळतं आणि ऊर्जा म्हणून वापरतं.

कमी झोपेमुळं वजन वाढू शकतं
झोपेच्या कमतरतेमुळं शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते. ज्यामुळं आतड्यांवरील सूक्ष्मजंतूंवर नकारात्मक परिणाम होतो. सूक्ष्मजंतूंच्या असंतुलनामुळं चयापचय मंदावतो आणि शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. याशिवाय, रात्री उशिरा झोपल्यानं जंक फूड किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ खाण्याच्या सवयींमुळंही वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.

Web Title: weight loss tips while you are sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.