डाएट शिवाय वजन कमी करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अधिक सोपा, घ्या जाणून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:25 PM2021-08-16T17:25:23+5:302021-08-16T17:32:52+5:30

आज आम्ही तुम्हाला डाएट न करताही वजन कमी करण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

weight loss tips without diet, know how to loose your weigh without diet | डाएट शिवाय वजन कमी करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अधिक सोपा, घ्या जाणून अधिक

डाएट शिवाय वजन कमी करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अधिक सोपा, घ्या जाणून अधिक

Next

वजन कमी करण्यासाठी अनेकजण अनेक गोष्टी करतात. जेव्हा आपण काही किलो वजन कमी करण्याचा विचार करता, तेव्हा आपल्यासमोर दिसते ते डाएट. त्यासाठी आपण आपले आवडते पदार्थही सोडून देण्याची तयारी करतो. जरी आहार आपल्याला निरोगी वजन राखण्यास मदत करू शकतो, तरी इतर अनेक पर्याय आहेत जे आपल्या वजन कमी करण्यास मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला डाएट न करताही वजन कमी करण्याचे अनेक मार्ग सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

डाएटशिवाय वजन कसे कमी करावे?
वजन कमी करणे कठीण आहे हे मान्यचं पण समर्पण आणि लक्ष देऊन, आपण आपल्या आवडत्या स्वादिष्ट पदार्थांपासून दूर न जाताही वजन कमी करू शकता. कोणत्याही प्रकारचे डाएट न करताही आपले वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी काही खात्रीशीर मार्ग आहेत.

व्यायाम महत्वाचा
आपण काही किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्यास शारीरिक क्रिया खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करण्या इतका दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. जर तुम्हाला चविष्ट खाणे सुरू ठेवायचे असेल, तर नियमित व्यायामाच्या रूटीनला चिकटून राहा.

जाणीवपूर्वक खाण्याच्या सवयींकडे लक्ष
जर, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडे नीट लक्ष दिले, तर कदाचित तुम्हाला तुमचे आवडते अन्न सोडावे लागणार नाही. आपण आपल्या पोटाच्या भुकेपेक्षा जास्त खात नाही ना, याची खात्री करा. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या मन भरेल इतके खाऊ नका. तर, तुमच्या पोटाची क्षमता विचारात घ्या.

अन्न नीट चावून खा
अन्नाचे छोटे घास घ्या आणि ते व्यवस्थित चावून खा. यामुळे तुमच्या पचनाला फायदा होईलच, पण ते तुम्हाला अति खाणे टाळण्यासही मदत करेल. अन्न हळूहळू चावून खाल्ल्याने तुमच्या शरीरावर अन्न प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने होते आणि तुम्हाला इतर उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांपासून दूर राहायला मदत होईल.

भरपूर पाणी प्या
जास्त खाणे वजन कमी करण्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, आपण नेहमी आपल्या जेवणापूर्वी भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे केवळ तुमची अन्नाची लालसा कमी होणार नाही, तर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले वाटेल, त्यामुळे तुम्ही कमी अन्न खाल.

तणाव पातळी कमी करा
जास्त खाणे आणि अव्यवस्थित खाण्याच्या सवयीसाठी तणाव आणि चिंता यामुळे असू शकतात, ज्यामुळे वजन अवाजवी वाढू शकते. आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाचे संप्रेरक असते, त्याचे असंतूलन झाले तर तुम्ही जास्त खाता, विशेषत: उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खात राहता. म्हणून, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अलीकडे खूप वजन वाढवले ​​आहे, तर तुमच्या तणावाच्या पातळीवर लक्ष ठेवा आणि तुमचा मूड हलका करा. सकारात्मक गोष्टींमध्ये सहभागी व्हा.

Web Title: weight loss tips without diet, know how to loose your weigh without diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.