Weight Loss Tips : कधीच कमी होणार नाही वजन जर खात असाल हे ५ पदार्थ, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:22 PM2022-04-18T13:22:01+5:302022-04-18T13:22:07+5:30
Weight Loss tips : काही पदार्थ असे असतात जे मेटाबॉलिज्मला हळूवार करतं आणि वजन फार कमी वेगाने कमी होतं. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ आहेत जे मेटाबॉलिज्मसाठी चांगले नाहीत.
Weight Loss tips : वजन कमी करणं काही सोपं काम नाही. लोक जिमपासून खाण्या-पिण्यात वेगवेगळे बदल करतात. तरी सुद्धा लोक हवं तसं वजन कमी करू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेटाबॉलिज्मवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मेटाबॉलिज्म एक अशी प्रक्रिया आहे ज्यात तुमचं शरीर अन्नाला एनर्जीत बदलतं. तुमची बॉडी कॅलरी बर्न करून त्या जेवढ्या जास्त एनर्जीमध्ये बदलाल तेवढ तुमचं वजन कमी होईल. पण काही पदार्थ असे असतात जे मेटाबॉलिज्मला हळूवार करतं आणि वजन फार कमी वेगाने कमी होतं. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ आहेत जे मेटाबॉलिज्मसाठी चांगले नाहीत.
रिफाइंड धान्य - पास्ता, ब्रेड आणि पिझ्झासारखे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात. पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हे पदार्थ खाऊ नका. जर खायचेच असतील तर यांचं प्रमाण योग्य ठेवा. जास्त प्रमाणात ग्लूटन, स्टार्च आणि फायटिक अॅसिडने मेटाबॉलिज्मला नुकसान पोहोचतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या एका रिसर्चनुसार, रिफाइंडऐवजी कडधान्य खाल्ल्याने कॅलरी वेगाने घटते. कारण कडधान्याने मेटाबॉलिज्म जास्त अॅक्टिव होतं.
अल्कोहोल - प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन करणं हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. महिलांनी दररोज एक आणि पुरूषांनी दोनपेक्षा जास्त ड्रिंक करणं धोक्याचं असतं. यापेक्षा जास्त ड्रिंक मेटाबॉलिज्मवर प्रभाव पडतो. जास्त मद्यसेवन केल्याने शरीराची वजन कमी करण्याची क्षमता ७३ टक्क्यांपर्यंत कमी होते. जास्त मद्यसेवन केल्याने शरीरात एसीटॅल्डिहाइड बनतं. या विषारी पदार्थाने शरीराच्या पचनक्रियेचं नुकसान होतं.
फ्रूट ज्यूस - फ्रूट ज्यूसने शरीराला नुकसान होतात. फ्रूट ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि यामुळे ब्लड ग्लुकोज फार जास्त वाढतं. ब्लड ग्लुकोज वाढल्याने मेटाबॉलिज्म हळूवार होतं. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही कॅलरी कमी बर्न करत आहात आणि फॅट जास्त वाढत आहे.
रेस्टॉरन्ट फ्राइड फूड- रेस्टॉरन्टच्या फ्राइड फूड्समध्ये हायड्रोजेनेटेड ऑइल किंवा ट्रान्स फॅट असतं. वेक फॉरेस्ट यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनुसार, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटऐवजी ट्रान्स फॅट डाएटने वजन वेगाने कमी होतं. इतकंच काय तर या फॅटसोबत कॅलरीच्या प्रमाणावरही प्रभाव करत नाही. फ्राइड फूडने लठ्ठपणा वाढतो आणि आरोग्यालाही नुकसान पोहोचतं.
फ्रोजन फूड - फ्रोजन फूडमध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण फार जास्त असतं. याने मेटाबॉलिज्म स्लो होतं. टेस्ट वाढवण्यासाठी अनेक फ्रोजन फूडमध्ये हायड्रोजेनेटेड ऑइलच्या रूपात खूप सारी शुगर, मीठ आणि ट्रान्स फॅट टाकलं जातं. या सर्वांमुळे लठ्ठपणा वेगाने वाढतो.