शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:14 AM2024-08-13T10:14:53+5:302024-08-13T10:16:07+5:30

Fenugreek Seeds Benefits : अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही यांचा वापर करू शकता. अशात आज आम्ही तुम्हाला मेथीच्या बियांचं सेवन कसं करावं आणि याचे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

Weight loss to treat asthma fenugreek seeds good for health | शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन

शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन

Fenugreek Seeds Benefits : मेथीची भाजी भरपूर लोक नेहमीच आवडीने खातात. तर मेथीच्या बियांचा वापर मसाला म्हणून अनेक पदार्थांमध्ये केला जातो. मेथीच्या बीया औषधी म्हणूनही वापरल्या जातात. पण जास्तीत जास्त लोकांना याचे फायदे माहीत नसतात. मेथीच्या बियांचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही यांचा वापर करू शकता. अशात आज आम्ही तुम्हाला मेथीच्या बियांचं सेवन कसं करावं आणि याचे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

बद्धकोष्ठता होईल दूर

मलावरोध म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्याचा जीव अगती मेटाकुटीस आलेला असतो. जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्यांच्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लगेच आराम मिळेल.

मेथीच्या बियांचे फायदे

मेथीच्या बीया वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी वापरले जातात. तसेच याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मेथी अनेक गुणांचा खजिना आहे असं म्हटलं जातं. खासकरून मेथी पोटासाठी खूप चांगली मानली जाते. डायबिटीसच्या रूग्णांनी मेथीचं सेवन केल्याने त्यांना अनेक फायदे मिळतात. तसेच ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासही याने मदत मिळते. 

शरीरातील वेदना आणि थकवा

जर तुमच्या शरीराच्या एखाद्या अवयवामध्ये वेदना होत असेल किंवा तुम्हाला सतत जास्त थकवा जाणवत असेल तर तुम्ही २ ते ३ ग्रॅम मेथीचे दाणे घ्या आणि तेवढंच जिरं घ्या. या दोन्ही गोष्टी तुम्ही दुधात टाकून चांगल्या उकडू द्या. या दुधाचं सेवन केल्याने तुमच्या या समस्या दूर होतील.

सर्वायकल किंवा सायटिका

रात्री जर तुम्हाला चांगली आणि लवकर झोप येत नसेल तर ही सर्वायकल किंवा सायटिकाची समस्या आहे जी मेथीच्या दाण्यांनी दूर करता येते. मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.

अस्थमा किंवा छातीतील कफ

अस्थमाच्या रूग्णांसाठी मेथी फारच फायदेशीर मानली जाते. अस्थमा श्वासासंबंधी समस्या आहे जी फुप्फुसांना प्रभावित करते. ही समस्या झाल्यावर श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, अस्वस्थता आणि छातीवर दबाव जाणवू लागतो. तसेच याने छातीत जमा झालेला कफ बाहेर निघण्यासही मदत मिळेल.

वजन होईल कमी

ज्या लोकांचं वजन वाढलेलं असतं त्यांना वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. अशात जर तुम्हाला वजन कंट्रोल करायचं असेल तर उकडलेल्या मेथीच्या दाण्याच्या पाण्यात एक चिमुटभर सूंठ पावडर टाकून सेवन करा. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

मेथीचे इतरही फायदे

मेथीच्या बियांचं पाणी प्यायल्याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. अशांसाठीही मेथी फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते. 

मेथीच्या बियांचं या रूपात केल्या गेलेल्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हललाही संतुलित करण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो.  या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.

कसं कराल सेवन

वर देण्यात आलेल्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मेथीच्या बियांचं सेवन कसं करावं? तर एक ग्लास पाण्यात २ चमचे मेथीच्या बीया रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गरम करा आणि त्यात चिमुटभर सूंठ टाका. नंतर याचं सेवन करा.
 

Web Title: Weight loss to treat asthma fenugreek seeds good for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.