वजन कमी करायचंय?; सकाळी 'या' 5 हेल्दी ड्रिंक्सचं करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:17 AM2019-06-16T11:17:58+5:302019-06-16T11:21:01+5:30
भरपूर व्यायाम केल्यानंतर किंवा जिममध्ये तासन्तास घाम गाळल्यानंतरही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर, तुम्हाला काही हेल्दी मॉर्निग ड्रिंक्सचं सेवन करण्याची गरज आहे.
भरपूर व्यायाम केल्यानंतर किंवा जिममध्ये तासन्तास घाम गाळल्यानंतरही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर, तुम्हाला काही हेल्दी मॉर्निग ड्रिंक्सचं सेवन करण्याची गरज आहे. हे मॉर्निंग ड्रिंक्स फक्त वेट लॉस करण्यासाठी मदत करत नाहीत, तर आपल्या आरोग्याशी संबंधित इतर आजार दूर करण्यासाठीही मदत करतात. जाणून घेऊया अशा काही हेल्दी ड्रिंक्सबाबत...
बडिशोपचं पाणी
हे पाणी प्यायल्याने फक्त वजन कमी होत नाही, तर मेटाबॉलिज्म लेव्हल उत्तम राहण्यासाठीही मदत करतं.
असं करा तयार : दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक टिस्पून बडिशोप एकत्र करून रात्रभरासाठी भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.
जिऱ्याचे पाणी
जिऱ्याचे पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. जिऱ्याचे पाण्यामुळे शरीरामध्ये एंजाइम्स तयार होतात, जे कार्बोहायड्रेट, फॅट्स आमि ग्लूकोज पचवण्यासाठी मदत करतात. अॅन्टीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असलेलं जिऱ्याचं पाणी शरीरामध्य जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
असं तयार करा : एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जीरं एकत्र करून रात्रभरासाठी ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या.
ओव्याचं पाणी
ओव्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ओव्याच्या पाण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया वाढते. ज्यामुळे वजन कमी होतं.
असं तयार करा : एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा एकत्र करून रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यानंतर गाळून या पाण्यामध्ये मध एकत्र करा. रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन करा.
मध आणि लिंबाचं पाणी
लिंबामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. जे भूक शांत करतं. त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागत नाही. लिंबू आणि मध एकत्र केलेलं पाणी शरीरामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. तसेच वजन कमी करण्यासाठीही मदत करतात.
असं तयार करा : सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस एकत्र करून रिकाम्या पोटी याचं सेवन करा.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स आणि अॅन्टीइंफ्लेमेट्री असतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हे मेटाबॉलिक सिस्टम सुरळीत ठेवण्यासाठीही मदत करतात. यामध्ये झिरो कॅलरी असतात, ज्यामुळे वजन वाढत नाही.
असं करा तयार : एका पॅनमध्ये 2 कप पाणी गरम करा. त्यामध्ये ग्रीन टी एकत्र करून 3 ते 4 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर गाळून घ्या. थंड झाल्यानंतर एक चमचा मध एकत्र करून प्या.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.