तुम्हाला सतत भूक लागते का? ही असू शकतात कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 11:45 AM2018-10-09T11:45:55+5:302018-10-09T11:47:15+5:30
योग्य वेळेवर भूक लागणे ही एक हेल्दी बॉडी आणि पचनक्रियेचे संकेत आहेत. पण काय तुम्हाला दिवसातून अनेकदा भूक लागते? किंवा तुमच्या सततच्या खाण्यामुळे तुम्हाला मित्र बकासुर म्हणायला लागले आहेत?
(Image Credit : beachbaby.net)
योग्य वेळेवर भूक लागणे ही एक हेल्दी बॉडी आणि पचनक्रियेचे संकेत आहेत. पण काय तुम्हाला दिवसातून अनेकदा भूक लागते? किंवा तुमच्या सततच्या खाण्यामुळे तुम्हाला मित्र बकासुर म्हणायला लागले आहेत? तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर अशात ही स्थिती तुमच्यासाठी अधिक नुकसानकारक ठरु शकते.
सतत भूक लागण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ज्यात निराशा आणि सकाळचा नाश्ता न करण्याची सवय हेही कारणे असू शकतात. तसेच त्यासोबतच आणखीही काही कारणे असू शकतात ज्यामुळे तुम्हाला भूक लागू शकते.
१) तुम्ही जर काही औषधे घेत असाल तर त्यामुळेही तुम्हाला सतत भूक लागू शकते. त्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून असं होत असतं. अशा अनेक घटना पाहण्यात आल्या आहेत की, काही ठराविक औषधांच्या सेवनामुळे सतत भूक लागते.
२) वंडरबिल्ट यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्याने तुम्हाला तहान लागते आणि २४ तासानंतर तुमचं शरीर वॉटर रिटेंशनच्या माध्यमातून पाणी जमा करणे सुरु करतं. असे करण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जेची गरज पडते. त्यामुळेही तुम्हाला भूक लागू शकते. अशात मिठाचं सेवन कमी करावं.
३) एअर कंडिशनमध्ये नेहमी बसत असाल तर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक गरमीची गरज असते. आणि ही गरमी निर्माण करण्यासाठी तुम्हाला खाण्याची गरज असते. अनेक शोधांमधून समोर आले आहे की, कमी तापमानामुळे तुम्हाला भूक लागते आणि तुम्ही जास्त खाता. त्यामुळे तुम्ही थंड जागेवर जास्त वेळ घालवणे योग्य नाही.
४) मद्यसेवन केल्यावर अनेकजण जास्त जेवण करतात हे तुमत्या कधीना कधी लक्षात आलं असेल. मद्यसेवनामुळे तुमचं लेप्टिन स्तर प्रभावित होतो. लेप्टिन एक भूक निर्माण करणारा हार्मोन आहे, जेव्हा पोट भरतं तेव्हा हे हार्मोन मेंदुला खाणं रोखण्याचा संकेत देतात. एका अभ्यासानुसार, मद्यसेवन केल्यावर याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुमच्या मेंदुला वाटतं की, तुम्हाला भूक लागली आहे.