दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 09:58 AM2020-01-15T09:58:45+5:302020-01-15T10:34:12+5:30

काही लोक साधं दूध पितात तर काही लोक त्यात साखर घालून पिणं पसंत करतात. पण कधी तुम्ही गूळ टाकून दुधाचं सेवन केलय का? यावर बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल.

What are the benefits of consuming jaggery and milk together | दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

काही लोक साधं दूध पितात तर काही लोक त्यात साखर घालून पिणं पसंत करतात. पण कधी तुम्ही गूळ टाकून दुधाचं सेवन केलय का? यावर बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दुधात साखरेऐवजी गूळ टाकून सेवन करण्याचा अधिक फायदा होतो. खासकरून वजन कमी करण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. 

गुळातील सुक्रोज, ग्लूकोज, आयर्न आणि खनिज आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. यातील मिनरल्समुळे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. दुधातील कॅल्शिअम आणि गुळातील आयर्न मांयपेशी मजबूत करतात आणि सांधेदुखीपासूनही याने आराम मिळतो.

दूध आणि गुळाचे फायदे

१) दूध आणि गूळ एकत्र सेवन केल्याने डायजेशन म्हणजेच पचनक्रिया सुधारते. गुळाने पचनक्रियेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधासोबत गुळाचा एक छोटा तुकडा नक्की खावा.

(Image Credit : goqii.com)

२) अस्थमाने पीडित लोकांनाही याने भरपूर फायदा होतो. हवेतील ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खासकरून हिवाळ्यात शरीर तापमान योग्य ठेवण्यासाठी आणि कफ दूर करण्यासाठी दुधासोबत गूळ खाल्ल्याने फायदा मिळतो.

(Image Credit : lifealth.com)

३) ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या नेहमी होते, ते सुद्धा दूध आणि गुळाचं सेवन करू शकतात. दूध आणि गुळाच सेवन केल्याने सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. दुधात असलेल्या व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम आणि गुळात असलेल्या आयर्नमुळे सांधे मजबूत होण्यासही मदत मिळते. तुम्ही गुळाचा एक तुकडा आल्यासोबतही खाऊ शकता. 

४) शरीरात रक्ताची कमतरता झाली असेल तर गुळाने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. याने शरीरातील रक्त शुद्धही होतं. गुळात असलेल्या तत्वांमुळे हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं आणि सोबतच शरीराची इम्यूनिटीही बूस्ट होते. ज्या महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्या असते त्यांनाही एक ग्लास दुधासोबत गूळ खाल्ल्याने आराम मिळेल.

(Image Credit : shathayu.com)

५) वजन कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे मध चांगलं मानलं जातं, त्याचप्रमाणे गुळही वजन कमी करण्यास मदत करतो. गूळ हा केमिकल फ्री प्रक्रियेतून तयार होतो. त्यामुळे गुळाला साखरेपेक्षा चांगलं मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर साखरऐवजी गुळाच्या अधिक वापरावर अधिक जोर देतात. त्यासाठी दररोज झोपण्याआधी गरम दुधासोबत गूळ खावा, याने काही महिन्यातच तुमचं वजन कमी होऊ लागतं.


Web Title: What are the benefits of consuming jaggery and milk together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.