दर महिन्याला पाळी येण्याची वेळ चुकते का? जाणून घ्या असं का होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 03:44 PM2019-11-28T15:44:58+5:302019-11-28T15:56:13+5:30

बऱ्याच मुलींना पाळी दर महिन्याला वेळेवर येत नाही. तारखेच्या आधी किंवा तारखेच्या नंतर येते.

What are the causes of menstrual cycle change dates | दर महिन्याला पाळी येण्याची वेळ चुकते का? जाणून घ्या असं का होतं

दर महिन्याला पाळी येण्याची वेळ चुकते का? जाणून घ्या असं का होतं

googlenewsNext

बऱ्याच मुलींना पाळी दर महिन्याला वेळेवर येत नाही. तारखेच्या आधी किंवा तारखेच्या नंतर येते. तर कधी पंधरा दिवसातून सुद्धा येते.  आणि यामुळे अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो.  काही प्लॅन्स असतील तर पाळी आल्यामुळे कॅन्सल करावे लागतात. आणि चिडचिड होते. तर मग जाणून घ्या पाळी वेळेवर न यायला कारण काय आहेत. 

(image credit-Medilife.com)

१) बर्थ कंट्रोल पिल्स बर्थ कंट्रोल पिल्सच्या साईड इफेक्टमुळे हार्मोन्सचे संतूलन बिघडते. यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. सध्याच्या काळात  कमी वयातच गर्भनीरोधक गोळ्या घेतल्या जातात. त्या शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकतात. त्यामुळे पाळी लांबणीवर जाते.

(Image credit- Complete health guide)

२) मध्यमवयीन स्त्रियांना सुध्दा हा त्रास होतो. यात स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, इ. त्रास होतात. ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा-या बदलांमुळे असतात. पाळीच्या आधी १-२ आठवडे हा त्रास होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात. शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात.

(Image credit-Practo)

३) दीर्घकाळ तणावात राहिल्याने शरीरात एस्ट्रोजन नावाचे हार्मोन रिलिज होतो. शरीरातील याचे प्रमाण वाढल्याने मासिक पाळी वेळेवर येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्ट झाल्यास किंवा अति प्रमाणात काम करणे व खूप कमी खाणे.  ह्यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. जास्तीच्या व्यायामामुळे आणि श्रमामुळे थायरॉईड आणि ‘पिट्युटरी’ ग्रंथींवर परिणाम होऊन पाळी चुकू शकते. 

(Image credit- Digital Gate It)


४)शरीरातील थायरॉइड या हार्मेनसचे संतुलन बिघडल्यामुळे अनियमित पाळीचा त्रास उद्भवू शकतो. यात अचानक काही महिन्यांत वजन वाढते, थकल्यासारखं वाटतं. तसेच पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होतो. अशी लक्षणं दिसल्यास त्वरीत शरीराची तपासणी करणे गरजेचं आहे. 

(image credit- healthwantcare)

५) खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्याशी जवळचा संबंध असतो. शरीराशी निगडीत अनेक गोष्टी या आहाराशी निगडीत असतात. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल, तर त्याचा मासिक पाळीशी संबंध येतो. याशिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि खूप बारीक असणे, अशी पाळी चुकण्याची अनेक कारणे असू शकतात.

Web Title: What are the causes of menstrual cycle change dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.