पोटात डावीकडे होणाऱ्या वेदनेची काय कारणे असू शकतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 10:19 AM2019-11-02T10:19:06+5:302019-11-02T10:19:38+5:30
पोटात दुखणं एक सामान्य बाब आहे. पण यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. याबाबत नेहमीच सतर्क असायला हवं. कारण कधी-कधी पोटात दुखणं हे सामान्य असेलच असं नाही.
(Image Credit : clinicalpainadvisor.com)
पोटात दुखणं एक सामान्य बाब आहे. पण यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. याबाबत नेहमीच सतर्क असायला हवं. कारण कधी-कधी पोटात दुखणं हे सामान्य असेलच असं नाही. अनेकदा पोटात एकाच बाजूला दुखत असतं. सर्वात जास्त प्रकरणांमध्ये असं पाहिलं जातं की, लोकांच्या पोटात डावीकडे वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात वेदना होण्याची वेगवेगळी कारण असू शकतात. असंही असू शकतं की, पोटाच्या एका भागातील काही अवयवांमध्ये काही समस्या असू शकते. चला जाणून घेऊ असीच काही कारणे...
गॅस्ट्रायटीस
गॅस्ट्रायटीस ही पोटाची एक सामान्य समस्या आहे. हे पोटाच्या लायनिंगमध्ये सूज आल्याने असं होतं. सामान्यता ही समस्या त्या लोकांमध्ये अधिक होते, जे अल्कोहोलचं सेवन करतात. अनेकदा गॅस्ट्रायटीसची समस्या अल्सरमध्येही रूपांतरित होते. जर तुमच्या पोटाच्या डाव्या बाजूने काही दिवस सतत वेदना होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अपचनाची समस्या
पोटात दुखण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अपचन मानलं जातं. अनेकदा याने पोटात जळजळ, ब्लोटिंग आणि अॅसिडमुळेही होतं. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये अपचनाच्या समस्येमुळे पोटाच्या डावी बाजूने वेदना होतात.
स्टोन
किडनीमध्ये जर स्टोन असेल तर पोटाच्या डावी बाजूने वेदना होतात. किडनी स्टोन तेव्हा होतो जेव्हा किडनीमध्ये मिनरल्स जमा होतात. किडनीमध्ये छोटे स्टोन झाले तर दुखत नाही, पण यांचा आकार सामान्यापेक्षा अधिक झाल तर पोटात वेदना होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोटाच्या नसा ताणल्यामुळे...
अनेकदा पोटात दुखण्याची समस्या पोटातील नसा ताणल्या गेल्यामुळेही होते. काही लोकांमध्ये ही समस्या एक्सरसाइजमुळेही होते. पोटात ज्या भागातील नस ताणली जाते, त्या भागात वेदना होतात. डावीकडे ही समस्या अधिक होते, कारण सामान्यपणे व्यक्तीचा उजवा भाग एक्सरसाइज करण्यात अधिक सक्षम असतो.
कॅन्सरचाही धोका
अनेकदा पोटात दुखण्याचं कारण कॅन्सरही असू शकतं. कारण पोटात कॅन्सरच्या सेल्स जेव्हा सुरूवातीच्या स्टेजमध्ये असतात. तेव्हा वेदना होतात. जर तुम्हाला नेहमीच किंवा जास्त काळासाठी पोटात दुखत असेल तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.