ॲल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न पॅक करता?; किडनीसह हाडांचंही होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:01 PM2024-08-01T17:01:40+5:302024-08-01T17:16:11+5:30
आपल्यापैकी बहुतेकजण ॲल्युमिनियम फॉइल वापरतात. हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरही याचा वापर सर्रास केला जातो. अन्न ताजं ठेवण्यास यामुळे मदत होते.
मुलांसाठी किंवा स्वतः साठी टिफिन पॅक करायचा असल्यास, आपल्यापैकी बहुतेकजण ॲल्युमिनियम फॉइल वापरतात. हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरही याचा वापर सर्रास केला जातो. अन्न ताजं ठेवण्यास यामुळे मदत होते. भारतातील न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्या मते, ॲल्युमिनियम फॉइलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करण्याचे काही तोटे आहेत, ज्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे.
आरोग्यासाठी हानिकारक
ॲल्युमिनियम फॉइलचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. ॲल्युमिनियम हा धातू आहे आणि अन्नाच्या संपर्कात आल्यास तो अन्नात मिसळून जातो. विशेषतः एसिडिक आणि मसालेदार पदार्थ असल्यास ॲल्युमिनियमचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
मानसिक आरोग्यावर परिणाम
काही रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, ॲल्युमिनियमच्या अतिसेवनामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अल्झायमरसारख्या आजारांसाठी ॲल्युमिनियमचे जास्त प्रमाण जबाबदार आहे. हे पूर्णपणे सिद्ध झालं नसले तरी, तज्ञांनी ॲल्युमिनियम फॉइलचा मर्यादित प्रमाणात वापर करावा असा सल्ला दिला आहे.
किडनी आणि हाडांवर परिणाम
ॲल्युमिनियमचं जास्त प्रमाण असल्यास ते किडनी आणि हाडांसाठीही हानिकारक ठरू शकतं. ॲल्युमिनियम शरीरात जमा होऊ शकतं. तसेच यामुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या निर्माण होतात.
पर्यावरणासाठी वाईट
ॲल्युमिनियम फॉइलचे उत्पादन आणि त्याचा कचरा देखील पर्यावरणास हानिकारक ठरू शकतो. ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते आणि या प्रक्रियेतून ग्रीनहाऊस गॅस बाहेर पडतात. याशिवाय ॲल्युमिनियम फॉइल डंप करणं ही देखील मोठी समस्या आहे, कारण ते बायोडिग्रेडेबल नाही. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.