तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:59 AM2020-02-15T10:59:35+5:302020-02-15T10:59:42+5:30
तांबे म्हणजेच कॉपरमध्ये अनेक प्रकारचे चिकित्सक गुण असतात. अनेकांना तुम्ही तांब्याची अंगठी किंवा कडं वापरताना पाहिलं असेल. या सर्वच वस्तू खास असतात आणि इतर धातूंपेक्षा वेगळ्या असतात.
तांबे म्हणजेच कॉपरमध्ये अनेक प्रकारचे चिकित्सक गुण असतात. अनेकांना तुम्ही तांब्याची अंगठी किंवा कडं वापरताना पाहिलं असेल. या सर्वच वस्तू खास असतात आणि इतर धातूंपेक्षा वेगळ्या असतात. तांब्यात अॅंटी बॅक्टेरिअल आणि अॅंटी मायक्रो बॅक्टेरिअल तत्व आढळतात. जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. मॉडर्न सायन्सने सुद्धा हे मान्य केलं आहे की, तांब्याचा जर शरीराल स्पर्श झाला तर याने अनेक आजार दूर होतात. हेच कारण आहे लोक तांब्याचं ब्रेसलेट वापरतात. चला जाणून घेऊ तांब्याने आरोग्याला होणारे फायदे....
इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होते
कॉपर शारीरिक संतुलनात सुधारतं करतं आणि याने शरीर मजबूत होतं. तसेच तांब्याने रक्त शुद्ध होतं, हीमोग्लोबिन वाढतं आणि शरीरातील ब्लड सर्कुलेशनही ठिक राहतं. त्यासोबतच तांब्यामुळे शरीराचा विषारी धातुंच्या प्रभावापासूनही बचाव होतो.
निरोगी हृदय
कॉपर ब्रेसलेटमुळे हृदय सुद्धा निरोगी राहतं. याने हृदयरोग किंवा हार्ट अटॅकसारख्या समस्याही रोखल्या जाऊ शकतात.
ब्लड प्रेशर कंट्रोल करा
तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट वापरल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यात मदत मिळते. तांब्याच्या ब्रेसलेटचा वापर केला तर व्यक्तीचा ब्लड प्रेशर आधीपेक्षा स्थिर राहील.
हृदयाचं आरोग्य सुधारतं
कॉपर शरीरात कोलेजन, इलास्टिन आणि फायबरला क्रॉसलिंग करण्यास मदत करतं. तांबे आणि त्याच्या गुणांच्या कमतरतेमुळे धमण्या कमजोर होऊ शकतात. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, तांब्याची कमतरता असल्याने शरीरात असंतुलन होतं आणि यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं.
हाडे होतात मजबूत
जे लोक हाडांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण असतील त्यांनी तांब्याचं ब्रेसलेट नक्की वापरावं. याने सांधेदुखीची समस्या दूर होऊन हाडेही मजबूत होतात.
चमकदार होते त्वचा
तांब्यात अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे फ्री रॅडिकल्सना शरीरात विषारी पदार्थ पसरवण्यापासून रोखतात. याने त्वचा निरोगी राहते. सोबतच याने त्वचेचे सामान्य रोगही दूर होतात. तसेच याची अंगठी वापरल्याने हात, बोटे आणि पायांवरील सूजही कमी होते.
पोटाची समस्या होईल दूर
तांब्याने पोटासंबंधी समस्याही दूर होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही तांब्याचं ब्रेसलेट किंवा अंगठी वापरू शकता.