स्ट्रोक येण्याआधी दिसतात ही 5 लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 09:42 AM2024-01-11T09:42:42+5:302024-01-11T09:43:32+5:30

ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्ताच्या गाठी किंवा रक्तस्रावामुळे मेंदुतील रक्ताचा पुरवठा बाधित होतो.

What are the 5 warning signs of a stroke and stroke prevention tips | स्ट्रोक येण्याआधी दिसतात ही 5 लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

स्ट्रोक येण्याआधी दिसतात ही 5 लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

स्ट्रोक भारतात मृत्यू आणि अपंगत्वाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. वर्षाला 1.8 मिलियनपेक्षा जास्त लोक स्ट्रोकने प्रभावित होतात. भारतात स्ट्रोकच्या केसेसमध्ये वाढ होताना दिसत आहे. खासकरून वाढत्या वयाच्या लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते.

ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्ताच्या गाठी किंवा रक्तस्रावामुळे मेंदुतील रक्ताचा पुरवठा बाधित होतो. ज्यामुळे मेंदुवर परिणाम होतो. स्ट्रोक मुख्यपणे दोन प्रकारचे असतात, इस्केमिक स्ट्रोक आणि हेमोरेजिक स्ट्रोक.

स्ट्रोकचे दोन प्रकार

इस्केमिक स्ट्रोक मेंदुमध्ये रक्त पुरवठा करणाऱ्या एखाद्या धमणीमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे होतो. तर हेमोरेजिक स्ट्रोकमध्ये मेंदुतील एखाद्या भागात रक्तस्राव होतो. स्ट्रोकच्या घातक प्रभावामुळे व्यक्तीची शारीरिक क्षमता आणि मानसिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. हा अपंगत्वाचं आणि मृत्युचं कारण बनतो.

स्ट्रोकची लक्षण

स्ट्रोकच्या अटॅकआधी रूग्णामध्ये काही लक्षण दिसू लागतात. ज्यांवर लक्ष देण्याची गरज आहे. कुणाचा जीव वाचवायचा असेल तर पहिलं काम स्ट्रोकच्या लक्षणांची आणि संकेताची ओळख पटवा.

कमजोरी

दोन्ही हात आणि पायांमध्ये कमजोरी जाणवू शकते. रूग्णाचा एक हात सुन्न होऊ शकतो किंवा एका हात दुसऱ्या हाताच्या तुलनेत कमजोर वाटू लागतो. काही लोकांना हात वर करताना समस्या होऊ शकते.

भाषेसंबंधी समस्या

स्ट्रोकने पीडित व्यक्तीला भ्रमही होऊ शकतो. ते अस्पष्ट शब्द बोलू लागतात. व्यक्तीला आपली भाषा योग्यपणे बोलणं किंवा समजण्यात समस्या होऊ शकते. अशी भाषेसंबंधी समस्या झाल्यावर लगेच डॉक्टरांना भेटा आणि योग्य ते उपचार घ्या.

चालण्यात समस्या

स्ट्रोकमुळे, मेंदुचा एक भाग पूर्णपणे किंवा काही काळासाठी प्रभावित होऊ शकतो. ज्यामुळे व्यक्तीचं संतुलन आणि समन्वय प्रभावित होऊ शकतं. याकारणाने व्यक्तीला चालण्यात समस्या येते.

डोकेदुखी

असामान्य आणि जोरात डोकेदुखी होणं स्ट्रोकचा प्रमुख संकेत असू शकतो. अनेक दिवस सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. डोकं कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखत असेल. रूग्णाला डोकेदुखीसोबतच इतरही काही लक्षण दिसू शकतात. जसे की, डोकेदुखीसोबत उलटी, चक्कर येणे आणि कमजोरी वाटणे.

दृष्टिसंबंधी समस्या

दृष्टी कमी होणे किंवा ब्लर दिसत असेल तर हा स्ट्रोकचा संकेत असू शकतो. या आजारात मेंदुला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे दृष्टीसंबंधी समस्या होऊ शकते. या समस्येच्या लक्षणांमध्ये व्यक्तीला अचानकपणे एक किंवा दोन्ही डोळ्यांनी धुसर किंवा अंधार दिसू शकतो.

Web Title: What are the 5 warning signs of a stroke and stroke prevention tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.