काळ्या मिठाचं पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे, लगेच पिण्यास कराल सुरूवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 10:20 AM2023-08-04T10:20:33+5:302023-08-04T10:20:56+5:30
Black Salt Water : काळ्या मिठामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी गरजेचे आहेत.
Black Salt Water : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मिठाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. काळ्या मिठाचा वापर लोणचं बनवण्यासाठी, सलादमध्ये, काही ड्रिंक्समध्ये, लिंबू पाण्यात आणि फ्रूट सलादमध्ये केला जातो. ज्यामुळे टेस्ट वाढते. डाइटीशियन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, काळ्या मिठाचं पाणी प्यायल्याने आपल्या अनेक फायदे मिळू शकतात.
काळं मीठ कसं फायदेशीर
काळ्या मिठामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी गरजेचे आहेत. जर तुम्ही रोज काळ्या मिठाचं पाणी प्याल तर शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. चला जाणून घेऊ याचे फायदे...
1) डायबिटीसमध्ये मिळेल आराम
डायबिटीसच्या रूग्णांना साखर आणि मिठाचं सेवन कंट्रोल करण्याचा सल्ला दिला जातो. कारण पांढऱ्या मिठामध्ये सोडिअम जास्त असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका वाढतो. अशात बरं होईल की, डायबिटीसच्या रूग्णांनी पाण्यात थोडं काळं मीठ टाकून सेवन करावं. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
2) पचनक्रिया चांगली होते
जर रोज सकाळी काळ्या मिठाचं पाणी प्याल तर तुमची पचनक्रिया अधिक चांगली होईल, कारण याने पोटात हयड्रोक्लोरिक अॅसिड आणि प्रोटीन पचवणारे इंजाइम अॅक्टिव होतात. तसेच गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्याही होत नाहीत.
3) केसांसाठी फायदेशीर
काळ्या मिठामध्ये एक्सफोलिएटिंग आणि क्लींजिंग प्रॉपर्टीज आढळतात. ज्या केसांना मजबूत करण्यास मदत करतात. याने डोक्याची त्वचा आणि केस स्वच्छ होतात. केस अधिक सुंदर होतात.
4) वजन होईल कमी
भारतात वजन वाढण्याची समस्या फारच वाढली आहे. एकदा का वजन वाढलं तर अनेक आजार होतात. काळ्या मिठाच्या पाण्यात अॅंटी-ओबेसिटी तत्व अशतात ज्यामुळे वाढणारं वजन कमी होण्यास मदत मिळते.