गूळ आणि तिळाचं एकत्र सेवन केल्याने काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 10:53 AM2024-10-03T10:53:12+5:302024-10-03T10:54:12+5:30

Jaggery and til benefits : या दोन्ही गोष्टींचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, गूळ आणि तीळ हे कॉम्बिनेशन हिवाळ्यात सुपरफूड कसं ठरतं.

What are the benefits of consuming jaggery and sesame seeds together? | गूळ आणि तिळाचं एकत्र सेवन केल्याने काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज खाल!

गूळ आणि तिळाचं एकत्र सेवन केल्याने काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज खाल!

Jaggery and til benefits : काही दिवसांमध्ये थंडीला सुरूवात होईल. हिवाळ्यात जास्तीत जास्त लोकांची भूक वाढते. वेगवेगळे पदार्थ खाण्याची लोकांची ईच्छा वाढते. बरेच या दिवसांमध्ये गूळ आणि तीळ एकत्र खातात. या दोन्ही गोष्टींचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, गूळ आणि तीळ हे कॉम्बिनेशन हिवाळ्यात सुपरफूड कसं ठरतं.

गुळाचे पोषक तत्व

कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयरन आणि लोह व झिंक तसेच तांबे यात असतं. व्हिटॅमिनमध्ये फोलिक अ‍ॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असतात.

तिळातील पोषक तत्व

तिळामध्ये कॉपर, मॅगनीज, कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, लोह, झिंक, मोलिब्डेनम, व्हिटॅमिन बी 1, सेलेनियम आणि डायट्री फायबर सारखे पोषक तत्व असतात.

ब्लड शुगर होतं कंट्रोल

ब्लड शुगर कंट्रोल करण्यास या दोन्ही गोष्टी फार मदत करतात. सोबतच याने तुमची हाडेही मजबूत होतात. त्याशिवाय तुमच्या त्वचेचं आरोग्यही चांगलं होतं. तुम्ही तिळ आणि गूळापासून तयार एक लाडू रोज खावा. याने थंडीच्या दिवसात खूप फायदा मिळेल. याने शरीराला उष्णता मिळेल, ज्यामुळे शरीर व्हायरल इन्फेक्शनच्या जाळ्यात येणार नाही.

तणाव दूर होतो

गूळ आणि तीळ सोबत खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. हे पोटासाठीही चांगलं असतं. हिवाळ्यात याने सुरक्षा मिळते. कारण दोन्ही गोष्टी उष्ण आहेत. याने दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या तणावही दूर होतो. तिळामुळे तुमच्या शरीराचा एलर्जीपासूनही बचाव होतो. तसेच हे हृदयासाठीही फायदेशीर आहेत.

रक्ताची कमतरता दूर होईल

शरीरात रक्त कमी झाल्यावर वेगवेगळे आजार होऊ लागतात. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल किंवा शरीरात इन्फेक्शन झालं असेल तर तीळ आणि गुळाचा आहारात समावेश करा. याने शरीरात रक्त तर वाढतंच सोबतच शरीरातील रक्त शुद्धही होतं. तसेच शरीराची हीमोग्लोबिन लेव्हलही वाढते. 

निरोगी केस आणि त्वचा

शरीरात न्यूट्रिएंट्सची लेव्हल वाढवण्यासाठी तीळ आणि गुळाचे लाडू बनवून खाऊ शकता. याने तुमचे केस आणि त्वचा हेल्दी राहणार. तसेच त्वचेवरील सुरकुत्याही कमी होण्यास मदत मिळते.

Web Title: What are the benefits of consuming jaggery and sesame seeds together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.