रोज रात्री झोपताना नाभिवर तेल टाकल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:15 PM2024-08-10T13:15:10+5:302024-08-10T13:29:35+5:30
Oiling or massaging your navel : अनेकांना रोज रात्री झोपताना नाभिमध्ये तेल टाकण्याचे किंवा तेलाने नाभिची मालिश करण्याचे फायदे माहीत नसतील. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Oiling or massaging your navel : वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी लोक शरीरावर तेल लावून मालिश करतात. हा एक जुना आणि पारंपारिक उपाय आहे. तेलाने शरीराची मालिश केल्याने शरीराला पोषण मिळतं आणि वेगवेगळ्या समस्या दूर होतात. बरेच लोक हात-पायांना, केसांना तेल लावून मालिश करत असतील पण त्यांना रोज रात्री झोपताना नाभिमध्ये तेल टाकण्याचे किंवा तेलाने नाभिची मालिश करण्याचे फायदे माहीत नसतील. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नाभिमध्ये तेल टाकण्याचे फायदे
- लोक शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची खूप काळजी घेतात. पण नाभिच्या स्वच्छतेवर फारचं लक्ष दिलं जात नाही. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, नाभिमध्ये हजारो घातक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. नाभिमध्ये तेल टाकलं तर कीटाणू आणि घाणीपासून सुटका मिळते. तसेच पोट आणि नाभिचा वेगवेगळ्या समस्यांपासून बचावही होतो.
- जर तुम्हाला चमकदार चेहरा आणि चांगली त्वचा हवी असेल तर नाभिची मालिश करा आणि त्यावर नियमितपणे तेल लावा. नाभिवर तेल लावल्याने तुमचं रक्त शुद्ध होतं, तसेच शरीरातील विषारी पदार्थही दूर होतात.
- कडूलिंबाचं तेल, गुलाबाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा लिंबू मिक्स करून नाभिवर लावू शकता. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात.
- मोहरीच्या तेलाने वेगवेगळे फायदे होतात. मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही बॅक्टेरिया दूर करू शकता. हे तेल इतकं फायदेशीर असतं की, या तेलाने पुन्हा बॅक्टेरियाही येत नाही.
- जर तुम्हाला पोटाच्या वेगवेगळ्या समस्या, पोट फुगणे किंवा मळमळ होणे अशा समस्या असेल तर नाभिमध्ये मोहरीचं तेल आणि आल्याचं मिश्रण लावल्याने या समस्या दूर होऊ शकतात.
नाभिमध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया
2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आपल्या एकट्या नाभिमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभि स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, जर कधी नाभिमध्ये खाज आली, नाभि लाल झाली, वेदना होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेळीच सावध व्हा. असं काही इन्फेक्शन झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.