5 तासांपेक्षा कमी झोप घेणं ठरू शकतं घातक, साइड इफेक्ट वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:16 PM2023-05-22T12:16:32+5:302023-05-22T12:17:19+5:30

Disadvantages of Sleeping Less Than 5 Hours: आजकालच्या धावपळीच्या जीवनात काम करणारे पुरूष किंवा महिलांना झोपण्यासाठी इतका वेळ मिळत नाही. चला जाणून घेऊ 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या शरीरावर काय वाईट परिणाम होतो.

What are the disadvantages of sleeping less than 5 hours | 5 तासांपेक्षा कमी झोप घेणं ठरू शकतं घातक, साइड इफेक्ट वाचून व्हाल हैराण

5 तासांपेक्षा कमी झोप घेणं ठरू शकतं घातक, साइड इफेक्ट वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

Disadvantages of Sleeping Less Than 5 Hours: चांगली आणि पुरेशी झोप आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट याचा सल्ला देतात की, एक हेल्दी वयस्काने 24 तासातून 8 तास झोप अवश्य घ्यावी. यानेच आरोग्य चांगलं राहतं. काही लोकांना इतकी झोप घेण्यासाठी इतका वेळ मिळतो, पण सगळेच इतके लकी नसतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनात काम करणारे पुरूष किंवा महिलांना झोपण्यासाठी इतका वेळ मिळत नाही. चला जाणून घेऊ 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या शरीरावर काय वाईट परिणाम होतो.

1) मेमरी लॉस

जर आपण 5 तासांची झोपही घेत नसू तर याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मेंदुवर पडतो. झोपेदरम्यान आपला मेंदू असं काम करतो ज्याने गोष्टी लक्षात ठेवणं सोपं जातं. याउलट जर आपण कमी झोपलो तर स्मरणशक्ती कमी होईल.

2) मूड स्विंग

जर आपल्या झोप येत नसेल किंवा पुरेशी झोप घेतली नाही तर याने मेंदू पूर्णपणे थकतो. यामुळे आपला मूडही चांगला राहत नाही. अशात डिप्रेशन, एंग्जाइटी, स्ट्रेस आणि मूड स्विंग होणं कॉमन आहे. याच कारणाने 8 तास झोप घ्यावी.

3) इम्यूनिटी कमजोर होणे

कोरोनाची लाट आल्यापासून इम्यूनिटी बूस्ट करण्याबाबत बोललं जात आहे. ज्यामुळे तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. तर जर तुम्हाला 5 तासांची झोप घेण्यासाठीही वेळ मिळत नसेल तर याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते.

4) डायबिटीसचा धोका

डायबिटीस भारतातच नाही तर जगभरात एक गंभीर आजार बनला आहे. जर तुम्हाला या आजाराचे शिकार व्हायचं नसेल तर नियमितपणे 8 तास झोप घ्यावी लागेल. असं केलं नाही तर ब्लड शुगर लेव्हल वाढेल आणि तुम्हाला डायबिटीसचा धोका राहील.

Web Title: What are the disadvantages of sleeping less than 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.