तुरटीच्या वापराने दूर होतील तुमच्या अनेक समस्या, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 05:08 PM2023-10-27T17:08:12+5:302023-10-27T17:21:40+5:30

Fitkari Health Benefits : तुरटीचे अनेक फायदे आहेत. कारण यात काही औषधी गुण असतात. चला जाणून घेऊ याचे फायदे...

What are the health benefits of alum useful for body and skin | तुरटीच्या वापराने दूर होतील तुमच्या अनेक समस्या, फायदे वाचून व्हाल अवाक्...

तुरटीच्या वापराने दूर होतील तुमच्या अनेक समस्या, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Fitkari Home Remedies:  आजही बरेच लोक वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा आधार घेतात. ज्यांचा त्यांना खूप फायदाही मिळतो. जेव्हा घरगुती उपायांचा विषय येतो तेव्हा तुरटीचाही त्यात समावेश असतो. अनेक प्रकारच दुखणं दूर करण्यासाठी तुरटी कामात येते. तुरटीचे अनेक फायदे आहेत. कारण यात काही औषधी गुण असतात. चला जाणून घेऊ याचे फायदे...

त्वचेसाठी फायदेशीर

तुरटीने त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. तुरटी चेहऱ्यासाठी नॅच्युरल क्लीन-अपचं काम करते. तुरटीच्या पाण्याने चेहऱ्याची मसाज केली तर चेहरा साफ होतो. याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.

केसातील मळ दूर होतो

शाम्पूमुळे केसांची सफाई तर होते. स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरील मळ-माती शाम्पूने निघत नाही. ज्यामुळे केसांमध्ये उवा होतात. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ होते. 

दाताचं दुखणं

तुरटी दातांसाठी फार फायदेशीर आहे. तुरटी नॅच्युरल माउथ वॉशचं काम करते. तुरटी पाण्यात टाकून गुरळा केल्याने दातांचं दुखणं कमी होतं. तसेच तुरटीचा माउथ वॉश तोडांची दुर्गंधीही दूर करतं.

जखम बरी करण्यासाठी

जखमेवर तुरटी लावली तर रक्त वाहणं बंद होतं. एखादी जखम झाली असेल तर तुरटीच्या पाण्याने ती धुवावी याने रक्त बंद होतं. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे जखमेला संक्रमणपासून रोखतात.

यूरीन इन्फेक्शन

तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी मायक्रोबियल गुण असतात. यूरीन इन्फेक्शन दूर करण्यासाठी इंटिमेट एरियाला तुरटीच्या पाण्याने वॉश करता येऊ शकतं.

खोकला होतो दूर

तुरटीने खोकल्याची समस्याही दूर होते. तुरटीच्या पाण्याने गुरळा केल्याने घशातील  खवखव दूर होते. तुरटीचं पावडर मधासोबत चाटलं खोकल्याची समस्याही लगेच दूर होऊ आराम मिळतो.

Web Title: What are the health benefits of alum useful for body and skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.