सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी पिण्याचा का दिला जातो सल्ला? फायदे वाचाल तर रोज प्याल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:25 PM2024-08-14T13:25:17+5:302024-08-14T13:39:08+5:30

Coriander Seeds Water Benefits: आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी एक खास सोपा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.

What are the health benefits of coriander water drink on empty stomach? | सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी पिण्याचा का दिला जातो सल्ला? फायदे वाचाल तर रोज प्याल...

सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी पिण्याचा का दिला जातो सल्ला? फायदे वाचाल तर रोज प्याल...

Coriander Seeds Water Benefits: आजकाल आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. बरेच लोक लठ्ठपणामुळे हैराण आहेत. तेही वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि इतर व्यायाम करत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी एक खास सोपा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हा तुम्ही रोज घरीच करून अनेक फायदे मिळवू शकता.

धणे हा एक असा मसाला आहे ज्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. भारतीय किचनमध्ये याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतो. धण्यांमध्ये व्हिटमिन सी, व्हिट्रमिन के, आयर्न, कॅल्शिअमसारखे अनेक पोषक तत्व असतात. यातून फायदा मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी धण्याच्या पाण्याचं सेवन करावं लागेल. अशात सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्याने काय फायदे होतात? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हृदय निरोगी राहतं 

सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे धण्याच्या पाण्याचं सेवन केल्याने हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. तसेच याच्या नियमित सेवनाने शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

धण्यांमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो. तसेच धण्यांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे शरीराचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सचाही खात्मा होतो. 

वजन होईल कमी

मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी करण्यासाठी धण्याचं पाणी खूप फायदेशीर मानलं जातं. या पाण्यातील तत्व वजन कमी करण्यास मदत करतात. अशात जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर नियमितपणे या पाण्याचं सेवन केलं पाहिजे.

पोटासाठी फायदेशीर

धण्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्याने गॅस, ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या आणि अपचन अशा समस्या दूर होण्यास मदत मिळते.

त्वचा चांगली राहते

एक्सपर्टनुसार, धण्याचं पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेवर चमकदारपणा येतो. धण्यामध्ये अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे त्वचा स्वच्छ आणि चमकदार करण्यास मदत करतात.

काविळ

काविळ झाल्यास धणे, साखर, आवळा, वडाचे मूळ समान प्रमाणात बारीक करा. सकाळी आणि संध्याकाळी अर्धा ग्लास पाण्यात १ चमचा ही पावडर सेवन केल्यास काविळ, यकृतातील सूज आणि लघवी कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात.

कसं कराल सेवन?

रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात एक चमचा धणे भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी गाळून त्याचं सेवन करा आणि धणे चावून खावेत.
 

Web Title: What are the health benefits of coriander water drink on empty stomach?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.