'या' आरोग्यविषयक समस्यांवर नारळ पाणी आहे रामबाण उपाय; फायदे ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:45 PM2024-07-25T16:45:13+5:302024-07-25T16:56:31+5:30

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात.

what are the top benefits of tender coconut water | 'या' आरोग्यविषयक समस्यांवर नारळ पाणी आहे रामबाण उपाय; फायदे ऐकून व्हाल चकित

'या' आरोग्यविषयक समस्यांवर नारळ पाणी आहे रामबाण उपाय; फायदे ऐकून व्हाल चकित

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही याला चांगली मागणी आहे. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ पाणी प्यायल्याने कोणते आजार आणि समस्या दूर होऊ शकतात हे सांगितलं आहे. 

'या' समस्यांपासून मिळतो आराम 

लठ्ठपणा

लठ्ठपणा हा आजार नसून तो अनेक आजारांना आमंत्रण देतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरतं. 

हाय ब्लड प्रेशर

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज नारळ पाणी प्यावं. कारण ते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि नंतर फॅट कमी झाल्यामुळे बीपी हळूहळू सामान्य होऊ लागतं. 

हृदयरोग

भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या जास्त आहे, म्हणून नारळ पाणी प्यावं. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

संसर्गापासून संरक्षण

कोरोनाच्या कालावधीनंतर आपण संसर्ग टाळण्याबाबत खूप जागरूक झालो आहोत. अशा परिस्थितीत आपण जर नारळ पाणी नियमितपणे प्यायलो तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण संक्रमण आणि अनेक आजारांशी सहज लढू शकतो.
 

Web Title: what are the top benefits of tender coconut water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.