तुमच्या सकाळच्या 'या' 4 सवयी वजन कमी करण्यासाठी ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:36 PM2019-06-19T16:36:21+5:302019-06-19T16:37:30+5:30
सकाळच्या चांगल्या सवयी सगळेच सांगतात. काही लोक तर गोंधळून जातात. त्यांना समजतचं नाही की, सकाळच्या चांगल्या सवयी म्हणजे नेमकं काय?
(Image Credit : WallpapersHd.Live)
सकाळच्या चांगल्या सवयी सगळेच सांगतात. काही लोक तर गोंधळून जातात. त्यांना समजतचं नाही की, सकाळच्या चांगल्या सवयी म्हणजे नेमकं काय? तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुम्हाला हैराण होण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सकाळच्या अशा चांगल्या सवयींबाबत सांगणार आहोत, ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर सवयींनुसार ही कामं केली तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते.
सकाळच्या वेळी काही कामं सतर्क राहून केली तर वजन नियंत्रणात राहतं. सकाळच्या या चार सवयी आहेत, ज्या तुम्हाला शरीराच्या समस्यांपासून आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत करतात. आता तुम्हाला वाटत असेल की, या सवयी अंगीकारण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल किंवा फार कष्ट करावे लागतील. तर असं काहीच नाही. या सवयी फार सोप्य आहेत.
तुम्हाला सवयींचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर त्यांना नियमित काटेकोरपणाने फॉलो करावं लागेल. सकाळची वेळ सूर्यकिरणांसोबत नवीन ऊर्जा घेऊन येतो आणि तो अनेक प्रकारची पोषक तत्व वाढविण्यासाठीही काम करतात.
सूर्याची किरणं
दररोज सकाळी अंथरून सोडल्यानंतर थोडा वेळ उन्हामध्ये उभं राहा. खासकरून सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत जर तुम्ही ऊन्हामध्ये जात असाल तर शरीराला ऊर्जा मिळते. तसेच मूडही उत्तम राहतो.
एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती दररोज सकाळी सूर्यप्रकाशात उभे राहतात. त्यांचं बॉडी मास इंडेक्स उत्तम राहतं. त्यामुळे सकाळच्या चांगल्या सवयींमध्ये तुम्ही या सवयीचा प्रामुख्याने समावेश करणं फायदेशीर ठरतं.
व्यायाम करा
कोणत्याही वेळी एक्सरसाइज करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म ठिक करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे वजन कमी होतं. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल तर एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा मूड उत्तम होतो. तसेच अस्वस्थताही दूर होते.
नाश्ता
अनेक संशोधनांनुसरा, ज्या व्यक्ती नाश्ता करत नाहीत. त्यांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. परंतु नाश्ता केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया सुरळीत होते आणि मूड चांगला राहतो. याव्यतिरिक्त रक्तामध्ये ग्लूकोजचं प्रमाण संतुलित करण्यासाठीही मदत होते.
नाश्त्यासाठी अंडी, केळी एवोकाडो खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही जे पदार्थ खाता. त्यांच्यासाठी व्हिटॅमिन आणि पोषक त्व वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
स्ट्रेचिंग करा
जसं तुम्ही सकाळी उठता तेव्हा थोडीशी स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही तुमचा दिवस चांगला व्यतित करण्यासाठी सकाळी उठून स्ट्रेचिंग करणं आवश्यक असतं. खासकरून गुडघे आणि मणक्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक्सरसाइज करणं फायदेशीर असतं.
वरील सर्व गोष्टींचा सकाळच्या सवयींमध्ये समावेश करा. वजन कमी होण्यासोबतच आरोग्य उत्तम राखण्यासाठीही करतात मदत.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.