बर्ड फ्लू म्हणजे नक्की काय?; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:08 AM2019-11-09T11:08:14+5:302019-11-09T11:12:39+5:30
'बर्ड फ्लू' हा आजार एवियन इन्फ्लूएंजा वायरस H5N1 मुळे होतो. हा वायरस पक्षी आणि माणसांना आपलं शिकार बनवतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन चिकन, टर्की, मोर आणि बदक यांसारख्या पक्ष्यांमुळे पसरतो.
(Image Credit : nbcnews.com)
'बर्ड फ्लू' हा आजार एवियन इन्फ्लूएंजा वायरस H5N1 मुळे होतो. हा वायरस पक्षी आणि माणसांना आपलं शिकार बनवतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन चिकन, टर्की, मोर आणि बदक यांसारख्या पक्ष्यांमुळे पसरतो. हा इन्फ्लूएंजा वायरस फार धोकादायक असून यामुळे पक्ष्यांसोबतच माणसांचाही मृत्यू होण्याचा धोका असतो.
बर्ड फ्लूच्या लक्षणांबाबतची माहिती प्रत्येकाला होणं आवश्यक आहे. कारण काही लोक बर्ड फ्लूचे शिकार असतात आणि त्याला साधारण तार समजून उपचार करत असतात. आतापर्यंत ब्लड फ्लूचं मुख्य कारण पक्षांनाच मानलं जातं. पण अनेकदा हा आजार माणसांकडून माणसांमध्येही पसरतो.
बर्ड फ्लूची लक्षणं :
बर्ड फ्लूची लक्षणं साधारण तापासारखीच असतात. परंतु, बर्ड फ्लू झालेल्या लोकांना श्वसनाच्या अनेक समस्यांसोबतच सतत उलट्या होण्याची समस्याही उद्भवते. या आजारांमध्ये इतर लक्षणं ही साधारण असतात.
- ताप
- छातीमध्ये कफ होणं
- नाक वाहणं
- डोकेदुखी
- घशामध्ये सूज येणं
- स्नायूंना वेदना होणं
- सांधेदुखी
- पोटाच्या समस्या
- सतत उलट्या होणं
- अस्वस्थ वाटणं
- श्वसनासंदर्भातील विकार
- न्युमोनिया
- डोळ्यांच्या समस्या
का होतो बर्ड फ्लू?
सामान्यतः माणसांमध्ये हा आजार कोबड्यांमुळे किंवा बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांच्या सानिध्यात आल्यामुळे होतो. एखाद्या पक्ष्याला हा आजार झाला असेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्या सानिध्यात आलात तर हा आजार तुम्हालाही होऊ शकतो. माणसांमध्ये बर्ड फ्लू या गंभीर आजाराचा वायरस डोळे, नाक आणि तोडांमार्फत प्रवेश करतो.
असा करा बचाव :
- बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांपासून दूर रहा.
- एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यापासून लांब रहा.
- बर्ड फ्लूची साथ आली असेल तर नॉन व्हेज खाणं टाळा.
- नॉन व्हेज खरेदी करताना स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या.
- बर्ड फ्लूची साथ असलेल्या ठिकाणी जाऊ नका किंवा मास्क लावून जा.
बर्ड फ्लूवर उपचार :
बर्ड फ्लूवर उपचार म्हणून एंटीवायरल ड्रग ओसेल्टामिविर (टॅमीफ्लू) (oseltamivir (Tamiflu) )आणि जानामिविर (रेलेएंजा) (zanamivir (Relenza)) परिणामकारक ठरतं. हा वायरस कमी करण्यासाठी लागण झालेल्या व्यक्तीने पूर्णपणे विश्रांची घेणं गरजेचं असतं. तसेच हेल्दी डाएट घेणं गरजेचं असतं ज्यामध्ये द्रव्यस्वरूपातील पदार्थांचा जास्त समावेश असेल. बर्ड फ्लूची लागण इतर लोकांना होऊ नये म्हणून बाधा झालेल्या रूग्णाच्या संर्कात येणं टाळा.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.)