ब्रेन डेड म्हणजे नक्की काय? जाणून घ्या कोमात जाणं आणि ब्रेन डेड यातील फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:04 PM2020-04-22T14:04:12+5:302020-04-22T15:47:30+5:30
ब्रेन डेड अशी स्थिती आहे. यात मेंदू शरीराला प्रतिसाद देत नाही. ज्यात शरीराची हालचाल, डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल, श्वास घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होते.
उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग उन सध्या एका ऑपरेशनच्या अपयशामुळे मृत्यूशी झुंज देत असल्याचा दावा केला जात आहे. कोरीयाचे हुकूमशहा किम जोंग यांच्याविषयी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार किम हे ब्रेन डेड या अवस्थेत आहेत. तुम्हाला वाचून प्रश्न पडला असेल ब्रेन डेड म्हणजे नक्की काय? असं काय होतं म्हणून मेंदू आपलं कार्य पूर्णपणे बंद करतो? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं देणार आहोत.
ब्रेन डेड अशी स्थिती आहे. यात मेंदू शरीराला प्रतिसाद देत नाही. ज्यात शरीराची हालचाल, डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल, श्वास घेण्याची प्रक्रिया काही प्रमाणात बंद होते. या स्थितीत फक्त मेंदू काम करणं थांबवतो. हृदय, लिव्हर, किडनी यांचे कार्य सुरू राहतं. म्हणजेच व्यक्तीचं शरीर जीवतं असतं पण त्याला संवेदना जाणवत नसतात. कोणत्याही व्यक्तीला ब्रेन डेडची समस्या उद्भवते, तेव्हा रुग्णाचे रेस्पिरेट्री फंक्शन निंयत्रणात नसतात. यामुळे रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होणं, शारीरिक विधी बंद होणं, कितीही वेदना होत असतील तरी जाणीव न होणं अशा समस्या जाणवतात.
माणसाच्या मेंदूमध्ये तीन भाग असतात. ब्रेन स्टेम हा मिड ब्रेन म्हणजेच मेंदूचा मधला भाग असतो. बोलण्याची, पापण्या हलवण्याची, चालण्याची, एक्सप्रेशन देण्याची क्रिया ब्रेन स्टेममार्फत होत असते. ब्रेन डेडची समस्या असेल तर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येतं. जेणेकरून श्वास घ्यायला त्रास होणार नाही. तज्ञांच्यामते ब्रेन डेड असलेले व्यक्ती काही दिवस किंवा काही तासांपर्यंत जीवंत राहू शकतात. काहीवेळा या स्थितीतून बाहेर पडता येऊ शकतं. ब्रेन डेडच्या कारणावर व्यक्ती बरा होईल की नाही हे अवलंबून असतं.
ब्रेन डेडची अनेक कारणं असतात. औषधांचा ओव्हर डोस, साप चावणं, घातक ब्रेन इन्फेक्शन (मेनिनजाइटिस), मानसिक आजार कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. डोक्यावर पडल्याने किंवा रस्त्यात अपघात होऊन डोक्याला तीव्र जखम झाली तर संबंधित व्यक्ती कोमात जाऊ शकते. अशा दुखावतीत मेंदूत रक्तस्राव होतो किंवा सूज येते.
या समस्यांमुळे ब्रेन डेड झालं असेल तर रिकव्हरी होण्याची शक्यता असते. कारण जेव्हा याचा प्रभाव कमी होतो. तेव्हा ब्रेन पुन्हा व्यवस्थित काम करू लागतं. व्यक्ती कोमात जाते. तेव्हा रिकव्हरी होण्याची शक्यता असते. पण ब्रेन डेडच्या अवस्थेत शक्यता कमी असते. तपासणी दरम्यान कोमात गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांची बुबुळ प्रतिसाद देत असतात. पण ब्रेन डेडच्या अवस्थेत शरीर आणि मेंदू प्रतिसाद देत नाहीत.