का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:49 AM2018-10-29T10:49:49+5:302018-10-29T10:51:46+5:30

स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे.

What is brain stroke problem? What are the symptoms? | का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे?

का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे?

googlenewsNext

(Image Credit : Medscape)

मेंदूला पुरेसा प्राणवायू चा पुरवठा न मिळाल्याने मेंदूच्या पेशी मृत होतात.परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अटॅक अथवा लकवा, याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चालू तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.

ब्रेन स्ट्रोक कसा ओळखावा

- बोलायला आणि समजायला अवघड जाते. आवाजात फरक पडतो किंवा काही गोष्टी समजण्यास अडचण येते.

- चेहऱ्यावर, हात किंवा पाय यावर कमजोरी येते किंवा ते सुन्न होतात. विशेषतः शरीराच्या एका बाजूला भागाला जास्त जाणवते.

- एक किंवा दोन्ही डोळ्यांनी अंधुक किंवा काळे दिसू शकतं किंवा एकाचे दोन दिसू शकतात.

- अचानक डोक्यात खूप दुखणे आणि त्याच्याबरोबरच उलटी, चक्कर आणि बेशुद्ध होण्याची शक्यता आहे.

- चालताना अडचणी येतात.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे

लहान स्वरूपाच्या स्ट्रोक मध्ये मात्र अशी कोणतीही लक्षण दिसत नाहीत. मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याच काम होत असत.

१) अशक्तपणा येणे

२) डोळ्यांसमोर अंधारी येणे.

३) चालताना अडखळत चालणे

४) शरीराच संतुलन बिघडणे

५) स्मरणशक्ती वर परिणाम होणे

६) बधीरपणा येण

७) धुरकट किवा दुहेरी प्रतिमा दिसण

८) लकवा येणे

९) तोंड वाकडं होणं बोबडी बोलणे

१० एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं,

११) डोकं दुखणं

१२) झटके येणं

उपाय

- आपल्याला असणाऱ्या उच्च रक्तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असं आवश्यक आहे. तसचं त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असण गरजेच आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.

- धुम्रपान टाळावे

- कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.

- आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोचा अॅटिआॉक्सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो.

- अॅरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत.

- मानसिक ताणावर नियंत्रण ठेवाव.

- विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात.
 

Web Title: What is brain stroke problem? What are the symptoms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.