कॅलरीचा फंडा कळाल्याशिवाय कमी नाही होणार जाडेपणा, याप्रकारे कमी करा वजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 10:23 AM2019-04-05T10:23:11+5:302019-04-05T10:34:05+5:30

अनेकांना हे कळत नाही की, वेगवेगळ्या डाएट करून किंवा केवळ एक्सरसाइज करून लठ्ठपणा कमी करता येऊ शकत नाही.

What is calorie? How much calorie to eat per day for weight loss? | कॅलरीचा फंडा कळाल्याशिवाय कमी नाही होणार जाडेपणा, याप्रकारे कमी करा वजन!

कॅलरीचा फंडा कळाल्याशिवाय कमी नाही होणार जाडेपणा, याप्रकारे कमी करा वजन!

googlenewsNext

(Image Credit : Medical News Today)

लठ्ठपणा कमी करून एक फिट शरीर मिळवण्याची इच्छा सर्वांचीच असते. पण अनेकांना हे कळत नाही की, वेगवेगळ्या डाएट करून किंवा केवळ एक्सरसाइज करून लठ्ठपणा कमी करता येऊ शकत नाही. फॅट कमी करणे किंवा वजन कमी करणे याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. यात महत्त्वाचा मुद्दा ठरतात कॅलरी. आज आम्ही तुम्हाला कॅलरीबाबत सांगणार आहोत. फॅट लॉस आणि कॅलरी यांच्यात काय संबंध आहे? याबाबत अनेकांना प्रश्न पडलेले असतात. जे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

काय असतात कॅलरी?

कॅलरी हा शब्द आपण नेहमी ऐकतो, वाचतो. पण कॅलरी नेमक्या काय असतात? तर कॅलरी म्हणजे आपण जे काही खातो, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे कॅलरी. म्हणजे आपण जे खातो किंवा पितो त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेला मोजण्याच्या प्रमाणाला कॅलरी म्हटलं जातं. अजून एक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांतून वेगवेगळ्या कॅलरी मिळतात. 

(Image Credit : Oregon Sports News)

रोज किती कॅलरी आवश्यक? 

USDA नुसार, २५ ते ३० वयोगटातील पुरूषांनी रोज २, ९०० कॅलरी घ्यायला हव्यात. तर महिलांनी रोज २, २०० कॅलरी घ्याव्यात. हे प्रमाण सामान्य स्थितीसाठी आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुमच्या वर्कआऊटच्या हिशेबाने तुमची रोजची कॅलरीची गरज वेगवेगळी असू शकते. 

कॅलरींचा सोर्स जाणून घेणे महत्त्वाचे

जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर तुम्हाला कॅलरी सोर्सबाबत माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही जे काही खाता त्यातून मिळणाऱ्या कॅलरी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या आहे की वाईट. याने तुम्हाला फॅट लॉस करण्यास मदत होईल किंवा त्याने फॅट वाढतील? बाहेर मिळणारे जास्तीत जास्त पदार्थ किंवा रेस्टॉरंटच्या चटपटीत पदार्थांमध्ये वाईट कॅलरी असतात. 

यात ट्रान्स फॅट लपलेलं असतं किंवा हे पदार्थ डालडा, रिफाइन्डमध्ये तळलेले असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. याने जाडेपणा अधिक वाढतो. जर तुम्ही ताजा फ्रूट ज्यूस(बंद पॅकेटचं नाही) सेवन केलं तर हे तुमच्यासाठी चांगलं असेल. काहीही खाण्याआधी त्यातील असलेल्या वाईट आणि चांगल्या कॅलरीबाबत फरक करणे गरजेचं आहे. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. 

फॅट लॉससाठी किती कॅलरी गरजेच्या?

जर तुम्हाला फॅट(चरबी) लॉस करायची असेल तर साधारण रोजच्या एकूण कॅलरीपैकी ५०० कॅलरी कमी करायला हवी. यादरम्यान तुम्हाला कार्बोहायड्रेटने मिळणारी कॅलरी पूर्णपणे बंद करायची आहे. याचा अर्थ हा की, खाण्या-पिण्याच्या ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, ते पदार्थ खाणे तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे. 

तुमचा पूर्ण आहारातून प्रोटीनमधून मिळणाऱ्या कॅलरींना ५०-६० टक्के, फॅट २० टक्के आणि कार्बोहायड्रेटमधून मिळणारी कॅलरीचा आकडा ३० टक्के करायचा आहे. याचा फायदा हा होईल की, शरीरातील फॅट बर्न व्हायला सुरूवात होईल. दुसरा फायदा हा की, फॅटचं प्रमाण वाढल्याने तुमचं शरीर फॅट बर्निंग मोडवर येईल.

म्हणजे फॅट लॉस करताना जर तुम्ही योग्य प्रमाणात प्रोटीनचं सेवन कराल तर वजन कमी झाल्यावर तुमची त्वचा सैल होणार नाही. त्वचेच्या टोनिंगला एक चांगला शेप मिळेल. अनेक केसेसमध्ये लोक वजन कमी करतात पण प्रोटीनचं सेवन करत नाहीत, ज्यामुळे शरीरातून फॅट कमी होतं, पण त्वचा सैल होते. 

कमी खा आणि बर्निंग वाढवा

जर तुम्ही जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करत नाहीत, तर तुम्ही रोज कमीत कमी रोज ३० मिनिट पार्कमध्ये जाऊन फिजिकल अॅक्टिविटी करावी लागेल. ज्याने तुमच्या कॅलरी बर्निंगमध्ये बॅलन्स राहील. तुम्हाला कॅलरीचं सेवन तर कमी करायचं आहेच, पण सोबतच बर्नही करायच्या आहेत. तेव्हाच तुमचं वजन संतुलित राहील आणि जाडेपणा कधीच होणार नाही. सोबतच तुम्हाला वर्कआऊट करण्याआधी तज्ज्ञांचा सल्लाही घेणे गरजेचे आहे. 

(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: What is calorie? How much calorie to eat per day for weight loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.