दिवसभर गॅसच्या समस्येमुळे हैराण आहात का? जाणून घ्या यामागची खरी कारणं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:10 AM2022-08-09T11:10:38+5:302022-08-09T11:11:00+5:30
Gastritis Problem: ही समस्या तुम्हाला सतत त्रास देत असेल तर याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. यामागे काही खास कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ पोटात जास्त गॅस तयार होण्याची कारणे...
Reason For Gastritis Problem: आजकाल पोटात गॅसची समस्या होणं ही फार सामान्य बाब आहे. पण जेव्हा गॅस जास्त प्रमाणात तयार होत असेल तर त्रास जास्त होतो. जर तुम्हाला वाटत असेल की, ही समस्या तुम्हाला सतत त्रास देत असेल तर याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. यामागे काही खास कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ पोटात जास्त गॅस तयार होण्याची कारणे...
योग्य आहार न घेणे - असंतुलित डाएट आणि खराब खाण्या-पिण्यामुळे आपल्याला गॅसच्या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सायलिअमयुक्त फायबर पदार्थांचा समावेश करत असाल, तर हे तुमच्या पोटात गॅस तयार होण्याचं कारण असू शकतं. त्यासोबतच तुम्ही जर फास्ट फूडचं सेवन करत असाल किंवा दुषित तेलात तळलेल्या पदार्थांचं सेवन करत असाल तर तुम्हाला गॅसच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
दुषित हवेत श्वास घेणं - जर तुमच्या पोटात फार जास्त गॅस तयार होत असेल तर याचं एक कारण हेही असू शकतं की, तुम्ही बाहेरील दुषित हवेत श्वास घेता. हे खासकरून तेव्हा होतं जेव्हा तुम्ही तोंड उघडून जास्त श्वास घेता. अशात हवेसोबत काही बॅक्टेरियाज तुमच्या आतड्यांमध्ये जातात आणि याने तुमच्या पोटात गॅस तयार होतो. यातील काही हवा आंबट ढेकर किंवा मग गॅसच्या रूपात बाहेर येते.
चुकीच्या सवयी - आजकाल अनेकांना च्युंइग गम किंवा हार्ड कॅंडी चघळण्याची सवय असते. ज्यामुळे तुमच्या पोटात गॅस तयार होऊ शकतो. कारण हे चावताना तुमच्या पोटात अतिरिक्त हवा जाते. जी गॅसच्या रूपात बाहेर निघते. तेच घाईघाईने जेवल्याने किंवा स्ट्रॉ ने काही पिण्याची सवय असेल तर तुमच्या पोटात गॅस तयार होतो.
बद्धकोष्ठता - जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठतेची समस्या आहे आणि अन्न तुमच्या आतड्यांमध्ये हळूहळू जात असेल तर यानेही पोटात गॅस तयार होऊ शकतो. तसेच कधी कधी जास्त प्रमाणात जेवण केल्यानेही पचनतंत्र बिघडतं. ज्यामुळेही गॅसची समस्या निर्माण होते.
कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणं - जर तुम्हीही कार्बोनेटेड ड्रिंक्स जसे की, बिअर, सोडा किंवा कोणत्याही बुडबुड्यांच्या पेयाचं सेवन करत असाल तर तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. कारण याने पोटात गॅस तयार होतो. जर तुम्ही कार्बोनेटेड ड्रिंक्सचं सेवन करत असाल आणि तुम्हाला गॅसची समस्या होत असेल तर हे ड्रिंक्स पिणं बंद करा.
मेडिकल कंडीशन - काही मेडिकल कंडीशन अशा असतात, ज्यामुळे तुमच्या पोटात गॅस तयार होऊ शकतो. जसे की, डाइवर्टिक्यूलायटीस, अल्सरेटिव कोलायटिस, क्रोहन्स डिजीज, इरिटेबल बाउल सिंड्रोम, डायबिटीज, थायराइड डिसफंक्शन किंवा इंटेस्टाइन ब्लॉकेज इत्यादी.