सकाळी उठल्यावर चेहरा सुजल्यासारखा दिसतो?; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 02:51 PM2019-10-14T14:51:37+5:302019-10-14T14:59:32+5:30
अनेकदा आपण पाहतो की, सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा सूजलेला असतो. 2 किंवा 3 तासांनी चेहऱ्यावरील सूज दूर होते आणि चेहरा नॉर्मल दिसू लागतो. यामध्ये घाबरण्याची गरज नाही.
अनेकदा आपण पाहतो की, सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा सूजलेला असतो. 2 किंवा 3 तासांनी चेहऱ्यावरील सूज दूर होते आणि चेहरा नॉर्मल दिसू लागतो. यामध्ये घाबरण्याची गरज नाही. कारण रात्री झोपल्यावर पेशींमध्ये झालेल्या बदलांमुळे चेहरा थोडासा सुजलेला दिसतो.
परंतु, दरवेळी चेहऱ्यावर सूज येण्याचं कारण हेच असेल असं नाही. अनेकदा चेहऱ्यावर सूज येण्यासाठी काही इतरही कारणं असतात. ज्यांच्याकडे आपण लक्षं दिलं पाहिजे. जाणून घेऊया काही खास कारणांबाबत ज्यांमुळे चेहऱ्यावर सूज येत असल्याचं सांगितलं जातं.
सायनसमध्ये संक्रमण झाल्यामुळे
चेहऱ्यावर सूज येण्याचं कारण अनेकदा सायनसमधील संक्रमण ठरू शकतं. अनियमित आहारशैलीमुळे सायनसमध्ये संक्रमण होतं. ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये नाक आणि चेहऱ्यामध्ये असलेल्या एका सायनस नलिकेमध्ये संक्रमण होतं. हे संक्रमण सकाळच्या वेळी जास्त असतं. ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येते. त्यामुळे सायनसमध्ये इन्फेक्शनचं चेकअप करणं आवश्यक असतं.
अॅलर्जी
जर चेहऱ्यावर, नाकामध्ये, कान, डोळे किंवा तोंडात झालेल्या इन्फेक्शमुळेही चेहरा सूजलेला दिसतो. ही अॅलर्जी कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. जसं उन्हामुळे, धूळ, प्रदूषणामुळे किंवा खाण्यातील एखाद्या पदार्थांमुळे. त्यामुळे या समस्येपासून बचाव करण्यासाठी त्यामागील योग्य कारणं कळणं आवश्यक आहे. योग्य कारण समजल्यानंतर त्या गोष्टी करणं टाळा किंवा इन्फेक्शनवर योग्य उपचार करा.
हृदयाच्या समस्या हेदेखील असू शकतं कारण
हृदयाच्या समस्यांमुळेही चेहऱ्यावर सूज येते. दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या हृदयासंबंधी समस्यांनी पीडित व्यक्ती आपल्या आहारातील सोडिअमचं प्रमाण वाढवतो. सोडिअममुळे रिअॅक्शनवर इफेक्ट होतो. त्यामुळे सूज येते. असचं काहीसं अस्थमा आणि दम्यामुळेही होतं.
मूत्रपिंडाशी निगडीत समस्या
शरीरातून टॉक्सिन आणि जास्त पाणी बाहेर टाकण्यासाठी किडनी आणि मूत्रपिंडाची महत्त्वाची भुमिका असते. एखाद्या कारणामुळे शरीरातील दूषित घटक शरीरातून बाहेर टाकले गेले नाही तर टॉक्सिन्स शरीरामध्ये राहतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा थोड्या वेळासाठी सूजलेला दिसतो.
या कारणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर सकाळी उठल्यानंतर सूज येते. त्यामुळे ही कारणं वेळीच लक्षात घेऊन त्यावर उपाय करा. अन्यता या समस्या गंभीर रूप धारण करू शकतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)