श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल टेंशन घेण्याआधी 'हा' प्रभावी उपाय वाचा....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:23 AM2020-03-31T10:23:55+5:302020-03-31T10:26:51+5:30
या थेरेपीमुळे रुग्णांच्या फुप्पुसांच्या क्षमतेला वाढवता येऊ शकतं. व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते.
सध्या बदलत्या जीवनशैलीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो. श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं अशा समस्या उद्भवतात. पण अशा समस्यांना न घाबरता काही उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ज्या लोकांची फुप्फुस व्यवस्थित काम करत नसतात. त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. त्यावेळी फिजीओथेरेपीची आवश्यकता असते. याद्वारे शरीरातील ऑक्सिजनची कमतरचा पूर्ण केली जाते.
चेस्ट परक्यूजन, चेस्ट वाइब्रेशन, टर्निंग, डीप ब्रीदिंग यांसारख्या थेरेपीचा समावेश केला जातो. अनेकांना असं वाटत असतं की चेस्ट फिजियोथेरेपीमुळे कोणत्या रोगाचा उपचार कसा होऊ शकतो. पण अनेक मोठे आजार बरे करण्यासाठी ही थेरेपी प्रभावी ठरत असते. या थेरेपीमुळे रुग्णांच्या फुप्फुसांच्या क्षमतेला वाढवता येऊ शकतं. व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आपल्याला इजा आणि दुखापत देखील होऊ शकते. लवचिकता राखण्यासाठी स्नायूंना ताण देण्यासाठी ही थेरेपी उपयुक्त आहेत.
फिजीओथेरेपी कधी करायला हवी याबाबत सुद्धा माहिती असणं गरचेचं आहे. काहीवेळा फिजीओथोरेपी करणं शरीरासाठी घातक सुद्धा ठरू शकतं. ज्यांच्या फुप्पुसांतून रक्तस्त्राव होत असेल, मानेला जखम झाली असेल, मानेच्या हाडाला जखम झाली असेल, त्यांची फुप्पुस पूर्णपणे निकामी झाली असतील, पल्मोनरी एम्बोलिज्म असेल, स्पाईनल इन्जुरी झाल्यास सुद्धा ही थेरेपी करू नये, शरीरात कोणतीही ताजी जखम झाली असेल तर ही थेरेपी करू शकत नाही.
डॉक्टारांच्या सल्ल्याने तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊन फिजीओथेरेपी करू शकता. आपल्या शरीराला चांगलं ठेवण्याासठी प्रत्येक अवयवांची देखील देखभाल करणं खूप जरुरी आहे. आपल्या शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे मेंदू, हृदय, फुप्फुस, पोटातील अवयव, स्नायू, हाडे आणि सांधे. फिजिओथेरेपिस्ट या सर्व उपचार पद्धतींचा वापर करून या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात.