काय आहे कोरोनासोमनिया आजार? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 03:44 PM2021-07-05T15:44:25+5:302021-07-05T15:45:42+5:30

आजकाल इनसोमनिया म्हणजेच अनिद्रेचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये अनिद्रिचे प्रमाण फारच वाढले आहे. कोरोना महामारीमुळे लोकांच्या झोपेवर वाईट परीणाम झाला आहे.

What is coronasomnia? Know the symptoms and remedies | काय आहे कोरोनासोमनिया आजार? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

काय आहे कोरोनासोमनिया आजार? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

Next

आजकाल इनसोमनिया म्हणजेच अनिद्रेचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये अनिद्रिचे प्रमाण फारच वाढले आहे. कोरोना महामारीमुळे लोकांच्या झोपेवर वाईट परीणाम झाला आहे. जगभरात अनेक लोक कोरोनासोम्निया (कोरोना+इंसोम्निया) नामक आजाराच्या विळख्यात सापडले आहेत.

काय आहे कोरोनासोमनिया?
कोरोनामुळे फक्त आरोग्यविषयकचं प्रश्न उभे राहिले नसुन, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, अर्थकारण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरीवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अनेकजण बेरोजगार तर झालेच पण ज्यांचा रोजगार सुरु आहे त्यांचे पगारही कपात केले जात आहेत. वर्क फ्रॉम होममुळे इतर आजारांचा धोका वाढला आहे. मानसिक समस्या वाढल्या आहेत. अर्थात याचा परिणाम झोपेवर होणारच त्यामुळे लोकांमध्ये अनिद्रेचे प्रमाण वाढले आहे. यालाच कोरोनासोमनिया म्हटले जाते.

सद्य स्थीती काय?
संशोधकांच्या म्हणण्यानुसार या कोरोना संक्रमण परिस्थीतीमुळे लोकांमध्ये अनिद्रेचे प्रमाण वाढले आहे. ते २४ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आले आहे. यामुळे झोपण्याच्या सवयी देखील बदलत आहेत. आजकाल झोपण्याची वेळ ३९ ते ६४ मिनिटांनी पुढे पुढे जात आहे. 

लक्षणं काय?

  1. इनसोमनिया सारखी लक्षणे म्हणजेच झोप न येणे, रात्री सारखी सारखी झोप तुटणे.
  2. एन्जायटी आणि डिप्रेशनची लक्षणे दिसणे
  3. दिवसा झोप येणे, कामात एकाग्रता नसणे, मुड खराब होणे.


सर्वात जास्त कुणाला भीती?

  1. कोव्हिड १९ पिडीत रोगी
  2. फ्रंटलाईन कार्यकर्ते
  3. रोग्यांची देखभाल करणारे
  4. विना वेतन काम करणारे
  5. आवश्यक सुविधांमधील कर्मचारी
  6. युवक, महिला, वयस्कर व्यक्ती
  7. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये जास्त प्रमाण

कोरोना पॉझिटीव्ह आलेले किंवा हा आजार होऊन गेलेले. काही लक्षणे दिसणारे यांच्यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाविषयीची भीती, माहितीचा अभाव, गैरसमज यामुळे अशा व्यक्तींमध्ये कोरोनामुळे इनसोमनिया होण्याचे प्रमाण जास्त आहे.

उपाय काय?

  • झोपण्यापूर्वी तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या सर्व गोष्टी कागदावर लिहाल. जसे की, एखादे काम करायचे आहे, कुणाला फोनवर बोलायचे आहे किंवा बिल भरायचे आहे. लिहिलेल्या गोष्टींमध्ये समानता असेल तर कागद कचऱ्यात टाका. त्याला कल्पनांचे वितरण असे म्हणतात.
  • बेडवर ऑफिसचे काम करु नका. यामुळे मेंदू सतर्क आणि तणावग्रस्त राहू शकतो. घरात दुसऱ्या रुममध्ये झोपण्याचा पर्याय असेल तर फायदा मिळू शकतो. 
  • दिवसा जो गोष्टी पाहू शकला नाहीत, त्यासाठी स्क्रीनमध्ये डोळे ताणून रात्र खराब करु नका. दुपारी २ वाजल्यानंतर चहा-कॉफी पिऊ नका. यामुळे शरीराला मेटाबॉलिज्मसाठी पुरेसा वेळ मिळतो.
  • रोज सकाळी 15 मिनिटे ऊन अवश्य घ्या. यामुळे मेलाटोनिन रिलीज थांबते. यामुळे सकाळी ब्रेन फॉगची स्थिती तयार होत नाही. या व्यतिरिक्त रोज एक्सरसाइज करा. यामुळे गंभीर अनिद्रेमुळे ग्रस्त लोकांच्या झोपेत २० मिनिटांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Web Title: What is coronasomnia? Know the symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.