- 100 डिग्री तापमानात विवस्त्र अवस्थेत केली जाते ही थेरपी; सेलिब्रिटी झालेयत क्रेझी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:32 AM2018-08-22T11:32:18+5:302018-08-22T11:49:17+5:30
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी आजकाल लोकं अनेक थेरपींचा आधार घेत आहेत. त्यामधील काही थेरपी नॅचरल असतात तर काही केमिकल्स बेस्ड असतात.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी आजकाल लोकं अनेक थेरपींचा आधार घेत आहेत. त्यामधील काही थेरपी नॅचरल असतात तर काही केमिकल्स बेस्ड असतात. सध्या लोकांमध्ये एका थेरपीचं क्रेझ वाढताना दिसत आहे. फक्त सामान्य लोकंच नाही तर अनेक सेलिब्रिटीही या थेरपीचा आधार घेताना दिसत आहेत. ही थेरपी म्हणजे 'क्रायोथेरपी'. ही एक नॅचरल थेरपी असून सध्या फार ट्रेन्डमध्ये आहे. जाणून घेऊयात नक्की काय आहे 'क्रायोथेरपी' आणि तिचे शरीराला होणारे फायदे...
काय आहे क्रायोथेरपी?
क्रायोथेरपीमध्ये व्यक्तिला एका खोलीमध्ये प्रमाणापेक्षा कमी तापमानात ठेवण्यात येतं. या थेरपीला 'आइस पॅक थेरपी' किंवा 'क्रायो सर्जरी' म्हणून ओळखण्यात येतं. एवढ्या कमी तापमानाचा बॉडी, नसा आणि त्वचा यांवर सरळ परिणाम होतो. या थेरपीच्या मदतीने शरीराच्या पेशींमध्ये होणारी गडबड ठिक करण्यात येते. याव्यतिरिक्त शरीरात रक्तप्रवाह वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं.
कशी करतात क्रायोथेरपी?
क्रायोथेरपीमध्ये व्यक्तीला विवस्त्र अवस्थेत एका खोलीमध्ये बंद करण्यात येतं. त्यानंतर या खोलीमध्ये -100 डिग्रीच्या थंड वाफा जवळपास 4 ते 5 मिनिटांपर्यंत सोडण्यात येतात. या थंड वाफा शरीरावर पडल्या की शरीर विषारी पदार्थांना प्यूरिफाय करायचं काम करतं. 4 ते 5 मिनिटं थंड वाफा सोडल्यानंतर पुन्हा खोलीतलं तापमान गरम होऊ लागतं. त्यावेळी पुन्हा थंड वाफा सोडण्यात येतात.
सेलिब्रिटींमध्ये पॉप्युलर आहे क्रायोथेरपी
हॉलिवुडच्या प्रसिद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्री केट मॉस, जेसिका अल्बा, जेनिफर एनिस्टन, डेमी मूरे या सगळ्या जणी वर्कआउट केल्यानंतर कमीत कमी 3 मिनिटं तरी या थेरपीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर कपूरचे ही थेअरपी करतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
क्रायोथेरपी चे फायदे:
1. त्वचेसंबंधीच्या समस्यांपासून सुटका होते.
2. शरीराच्या कोणत्याही भागावर जमा झालेले फॅट आणि सेल्युलाइट कमी करण्यासाठी या थेरपीचा वापर करण्यात येतो.
3. मायग्रेनमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठीही या थेअरपीचा उपयोग होतो.
4. क्रायोथेरपीमुळे थकवा आणि सूज कमी करता येते.
अशा परिस्थितीत क्रायोथेरपीचा वापर करू नका :
- दुखापत झाल्यावर
- हृदयाशी निगडीत आजार असल्यावर
- स्किन इन्फेक्शन असेल तर
- हाय ब्लड प्रेशर असेल तर
- थेरपीदरम्यान जास्त थंडी वाजली तर थेरपी घेणं थांबवा