स्लिम-ट्रिम फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी 'हा' डाएट प्लॅन फॉलो करते मानुषी छिल्लर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:41 PM2019-03-07T13:41:08+5:302019-03-07T13:42:27+5:30
जवळपास दोन दशकांनंतर 2017मध्ये देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. ही विश्वसुंदरी स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी, तसेच आपली सेक्सी फिगर मेन्टेन करण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएटवरही तेवढचं लक्ष देते.
जवळपास दोन दशकांनंतर 2017मध्ये देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. ही विश्वसुंदरी स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी, तसेच आपली सेक्सी फिगर मेन्टेन करण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएटवरही तेवढचं लक्ष देते. मानुषीला पाहताच अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे स्लीम-ट्रिम राहण्यासाठी नक्की ती करते तरी काय? आज आम्ही तुम्हाला मानुषीचे काही फिटनेस सीक्रेट्स सांगणार आहोत.
मानुषी आपल्या दिवसभराचं खाणं 6 छोट्या छोट्या मिल्समध्ये विभागून घेते. असं केल्याने तिल फक्त मुबलक पोषक तत्वांनीयुक्त खाणं मिळत नाही तर सतत खाण्यासाठी तिला होणारं क्रेविंगही शांत राहतं. मानुषीच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यापासून होते, ज्यामध्ये ती लिंबाचा एक तुकडा टाकून पिते. असं केल्याने शरीरातून हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
मानुषी सांगते की, ब्रेकफास्ट आपल्या दिवसाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचं डाएट असतं. त्यामुळे याबाबत जराही दुर्लक्षं करू नये. मानुषी ची ब्रेकफास्ट प्लेट प्रोटीन आणि गुड कार्बोहायड्रेटयुक्त असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये मानुषी अवोकाडो, रताळं आणि एग व्हाइट यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. यामुळे तिला दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत होते.
दुपारच्या जेवणाआधी हलकं स्नॅक्स म्हणून मानुषी एक कप ब्लॅक कॉफीसोबत फ्रूट किंवा नारळाचं पाणी पिणं पसंत करते. नारळाचं पाणी आतडं आणि पाचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय ते त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठीही मदत करतं.
लंचबाबत सांगायचे झालेच तर मानुषीचं दुपारचं जेवणं अगदी देसी स्टाइलमध्ये असतं आणि त्यामध्ये चपाती, डाळ, चिकनसोबतच दही आणि सलाड खाणं पसंत करते.
संध्याकाळच्या वेळी एनर्जी लेव्हल वाढविण्यासाठी मानुषी एक केळं आणि प्रोटीन बार खाते. शरीरासाठी पोषक तत्वांसाठी मानुषी हेल्दी ड्रायफ्रूट्सचंही सेवन करते.
रात्रीचं जेवण सर्वात हलकं असणं आवश्यक असतं. त्यामुळे मानुषी झोपण्यापूर्वी 3 तास अगोदर डिनर करते. डिनरमध्ये ती रोस्टेड चिकन किंवा ग्रिल्ड भाज्यां सपूसोबत खाणं पसंत करते.
डाएटनंतर वर्कआउटबाबत सांगायचे झाले तर ती स्ट्रेंथ ट्रेनिंग, योग, पिलाटेज, कार्डियो यांसारख्या एक्सरसाइज फॉलो करते. याव्यतिरिक्त मानुषी स्विमिंग करणं तिला फार आवडतं.
मानुषीच्या मनमोहक अदा :