तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमचे शरीर काय करत असते? घ्या जाणून...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 11:07 AM2021-07-18T11:07:49+5:302021-07-18T11:08:48+5:30
योग्य आहार, व्यायाम, झोप घेतल्याने त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. ज्यावेळी आपण रात्री शांत झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची काम करण्याची प्रक्रिया सुरु होते.
आपल्या शारीरीक क्रिया सुरुळीत ठेवण्यासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. तुमच्या शरीराला ७ ते ८ तास झोपेची गरज असते. त्यापेक्षा जास्त झोप वाईट असते व कमी झोपही वाईट असते. शांत आणि पुरेशी झोप घेतल्याने निरोगी राहण्यासही मदत होते. योग्य आहार, व्यायाम, झोप घेतल्याने त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. ज्यावेळी आपण रात्री शांत झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची काम करण्याची प्रक्रिया सुरु होते.
शरीराची कामाची प्रक्रिया-
नुकसान झालेल्या पेशींची भरपाई करणं
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं
दिवसभरातील थकवा घालवणं
दुसऱ्या दिवसासाठी हृदयाला सशक्त बनवणं
पुरेशी झोप घेणं हे शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. कारण जर तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा परिणाम शरीरासोबत आरोग्यवरही होतो.
मरगळ येणं
एकाग्रतेचा अभाव
निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं
चिडचिडेपणा
सुस्ती येणं
जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ पुरेश्या प्रमाणात झोप मिळत नसेल तर भास होण्याची समस्याही उद्भवते.
शांत आणि पुरेश्या झोपेसाठी खास टीप्स
झोपण्याचे तास ठरवा
आपल्याला किती काळ झोप आवश्यक आहे याची माहिती करून घ्या. अनेकांना केवळ सहा तासांची झोपही पुरेशी असते
बाहेरच्या वातावरणात थोडा वेळ द्या- यामुळे शरीरातील मेलाटोनीन हार्मोन्सचं कार्य सुधारतं. झोपणं आणि झोपेतूऩ उठण्यासाठी मेलटोनिन हार्मोन उपयुक्त असतं
झोपताना खोलीमध्ये थंडावा, शांतपणा आणि काळोख असणं गरजेचं आहे
झोपताना टीव्ही, मोबाईल, अभ्यास करणं किंवा खाणं टाळा
झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणं फायदेशीर ठरेल