Acid reflux म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या लक्षणं अन् उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:20 PM2021-06-17T15:20:03+5:302021-06-17T15:36:19+5:30

Acid reflux : अ‍ॅसिडिटी आणि अपचन हा गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लक्स डिसीझ नावाच्या विघटनाची स्थिती दर्शवितो ज्याला GERD म्हणून ओळखले जाते, जे पाचन तंत्राचा एक डिसऑर्डर आहे.

What exactly is acid reflux? Learn the symptoms and remedies ... | Acid reflux म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या लक्षणं अन् उपाय...

Acid reflux म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या लक्षणं अन् उपाय...

googlenewsNext

-  डॉ. जिग्नेश गांधी (कन्सल्टंट, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक अँड मिनिमल ऍक्सेस सर्जरी, ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई)

आजच्या वेगाने वाढणार्‍या जगात स्ट्रेसचे समानार्थी नाव म्हणजे अ‍ॅसिडिटी आहे. धडपडणारे शहरी जीवन यासह लवकर उठण्यासाठी लावलेले अलार्म आणि अस्वस्थ फूड हॅबिट्स व वेळ यांच्यासह कामाचे लांब-लचक तणावपूर्ण तास हे आपल्या विद्यमान अंतर्गत परिस्थीतीस कारणीभूत ठरले आहे. या समस्येचे व्याप्ती सर्व किशोरवयीन मुलांपासून ते सेवानिवृत्त एकाकी व्यक्तीपर्यंत आणि एका फळ विक्रेत्यापासून प्रसिद्ध सेलिब्रिटीपर्यंतच्या सामाजिक गटांमध्ये आहे.

अ‍ॅसिडिटी आणि अपचन हा गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लक्स डिसीझ नावाच्या विघटनाची स्थिती दर्शवितो ज्याला GERD म्हणून ओळखले जाते, जे पाचन तंत्राचा एक डिसऑर्डर आहे. ही फूड पाईप आणि पोटाशी संबंधित समस्या आहे. गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लक्स म्हणजे पोटातील सामग्री परत इसोफेगसमध्ये येणे आहे, ज्यामुळे गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लक्स डिसीझ होतो, जे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ, अस्वस्थता, मळमळ आणि एक्सट्रीम केसेसमध्ये अ‍ॅसिड सामग्री किंवा अबाधित अन्नाची उल्टी अशा वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होतात.

पाश्चात्य देशांमध्ये प्रकाशित झालेल्या GERD च्या व्याप्ती दराच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारतात GERD ची व्याप्ती प्रत्येक 5 व्या व्यक्तीला प्रभावित करण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांमध्ये त्यांच्या पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये व्याप्ती सुमारे 9.5% इतके आहे जे सामान्य लोकसंख्येमधील व्याप्तीचे प्रतिबिंब आहे व दुसऱ्या आणि तिसऱ्या यमिस्टर दरम्यान 50% आहे.

अन्नामध्ये अत्याधिक मसाल्यांचा अंतर्ग्रहण, चॉकलेटचे अति सेवन, वायूजन्य पदार्थ आणि कार्बोनेटेड पेय यांचा सेवन, चहा किंवा कॉफी, कॅफिनचा जास्त प्रमाणात सेवन फूड पाईपच्या खालच्या टोकाला आराम देतो, ज्यामुळे समस्येच्या तीव्रतेनुसार फूड पाइपमध्ये अ‍ॅसिड आणि अन्नाचा रिव्हर्स फ्लो होतो.

हे लक्षण जटिल होण्याचे प्रमुख कारण हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅकटेरिअल इन्फेक्शनपासून होणारे इन्फेक्शन आहे, भारतीय लोकासंख्येपैकी ६०% लोक या समस्येने ग्रस्त आहेत आणि दीर्घ कालावधीत यामुळे काही रूग्णांमध्ये पोटाचा कर्करोग होऊ शकतो. या इन्फेक्शनचे निदान करणे आणि ट्रिपल ड्रग थेरपीच्या स्वरूपात उपचार घेणे अत्यावश्यक आहे. 

क्रॅनबेरीला ज्यूसच्या स्वरूपात 20% व त्याहून अधिक कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेण्याच्या भूमिकेबद्दल एक उदयोन्मुख वैज्ञानिक पुरावे देखील आहेत जेणेकरून या इन्फेक्शनचे पुनरावृत्ती दर 20% कमी करता येईल, जे आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येसाठी एक मोठी संख्या आहे.

आजची जीवनशैली अल्कोहोल, धूम्रपान, शांत झोपेचा अभाव, बिंज इटिंग, मिडनाईट स्नॅकिंग, सबस्टेन्स अब्युस या सर्व गोष्टींशी संबंधित आहे, जे सर्व एकत्रितपणे किंवा अलिप्तपणे हायपर अ‍ॅसिडिटी आणि रिफ्लक्ससाठी कारणीभूत ठरते. सध्याच्या महामारीच्या काळात तणाव, कामाचा दबाव, नोकरीची असुरक्षितता आणि इतर अनेक सामाजिक कारणांमुळे हे शिखरावर पोहोचले आहे.

सामान्य लक्षणे म्हणजे घसा खवखवणे आणि त्यानंतर छातीच्या भागात जळजळ होणे व एक्सट्रीम केसेसमध्ये तीव्र वेदना होणे. या समस्येचा प्रगत टप्प्यात सतत मळमळ, दीर्घकाळापर्यंत कफ आणि लिक्विड आणि सॉलिड फूड सामग्रीचा रिफ्लक्स होतो, विशेषत: हेवी फॅटी मीलनंतर किंवा झोपेच्या वेळी होतो.

व्यक्तीला स्वत:ची औषधोपचार बरोबरच ओव्हर द काउंटर औषधे किंवा वैकल्पिक वैद्यकीय उपचार करण्यापासून स्वतःला थांबविले पाहिजे. गॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्टला भेट देणे आणि संपूर्ण नैदानिक मूल्यांकन करणे आणि समस्येच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक प्रकरणांमध्ये कॅमेरा टेस्ट (एंडोस्कोपी) आवश्यक असल्यास ते ही करण्यात शहाणपणा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, “वारंवार अ‍ॅसिड रीफ्लक्स कर्करोगजन्य असू शकते.” फूड पाईपमध्ये अ‍ॅसिड सामग्रीचा दीर्घकाळापर्यंत अ‍ॅसिड संपर्क झाल्यामुळे अंतर्गत परिस्थितीत बदल होऊ शकते आणि लोअर फूड पाईपमध्ये कर्करोग बदलांचा निर्माण होण्याची शक्यता असू शकते, ज्यामुळे प्रिव्हेंशन इझ बेटर देन क्युअर म्हणणे योग्य आहे.

यासाठी साधे उपाय म्हणजे निरोगी अन्नाचा नियमितपणे कमी प्रमाणात सेवन करणे आहे. 8 तासांची चांगली झोप घेणे, मिडनाईट स्नॅकिंग टाळणे आणि सामाजिक सवयी नियंत्रित ठेवणे अनिवार्य आहे. ज्यांना या समस्येचे निदान झाले आहे, त्यांनी नियमितपणे औषधांचा पाठपुरावा करायला पाहिजे आणि लक्षणे खराब होऊ नये यासाठी झोपण्याच्या किमान 3 तास आधी खाणे टाळावे.

दीर्घकाळात जर निरोगी जीवनशैली आणि औषधे मदत करत नाहीत तर लोकसंख्येच्या अगदी थोड्या लोकांना फूड पाईप वाल्वची सुधारात्मक शस्त्रक्रियाची  आवश्यकता असते जी फंडोप्लिकेशन शस्त्रक्रिया म्हणून मिनिमल अ‍ॅक्सेस लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे केली जाते.

छातीत जळजळ आणि हायपर अ‍ॅसिडिटी म्हणून आपण ओळखत असलेल्या गॅस्ट्रो ईसोफेगल रिफ्लक्स डिसीझच्या या कलमामध्ये जाण्यापासून टाळण्यासाठी आपल्याला 'हर्री,वर्री अँड कर्री' या तीन गोष्टी टाळण्याची गरज आहे.

Web Title: What exactly is acid reflux? Learn the symptoms and remedies ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.