ग्लुटेन म्हणजे नक्की काय? का होते याची अ‍ॅलर्जी?...जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 02:56 PM2021-07-04T14:56:07+5:302021-07-04T14:56:54+5:30

आपल्यापैकी काही जणांना आहारातील सर्वच पदार्थ मानवत नाहीत. काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही काहीजणांना होते. असाच एक पदार्थ म्हणजे ग्लुटेन. आता हे ग्लूटेन म्हणजे नक्की काय आहे ?

What exactly is gluten? why is it allergenic? understand everything | ग्लुटेन म्हणजे नक्की काय? का होते याची अ‍ॅलर्जी?...जाणून घ्या सर्वकाही

ग्लुटेन म्हणजे नक्की काय? का होते याची अ‍ॅलर्जी?...जाणून घ्या सर्वकाही

googlenewsNext

आपल्यापैकी काही जणांना आहारातील सर्वच पदार्थ मानवत नाहीत. काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही काहीजणांना होते. असाच एक पदार्थ म्हणजे ग्लुटेन. आता हे ग्लूटेन म्हणजे नक्की काय आहे ? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?  असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ग्लूटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लूटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेनमुळे आरोग्याला नुकसान पोहचतं. 

ग्लूटेनमुळेआहे हा धोका
आपण कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर, ग्लूटेन फ्री आहार घ्यावा. सीलीएक, व्हीट एलर्जी,इरीटेबल बाऊल सिंड्रोम असे त्रास असतील तार ग्लूटेनयुक्त पदार्थ खाऊ नयेत. जरी कोणताही आजार किंवा त्रास नसेल तरीही ग्लूटेन असलेले पदार्थ कमी खावेत किंवा या पदार्थांबरोबर फायबर,न्‍यूट्रिशनयुक्त पदार्थही घ्यावेत.

ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी म्हणजे काय?
संशोधनानुसार गव्हामधील ग्लूटेन प्रोटीन पोटाच्या आतील कोशिकांमध्ये  प्रतिकूल क्रिया करत असेल तर त्याला ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी म्हणतात.

या पदार्थांमध्ये असतं ग्लूटेन
ग्लूटेनचा वापर खाद्यपदार्थांना घट्टपणा येण्यासाठी आणि स्टॅबेलाईझ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याचं वर्गीकरण शक्य नाही , पण, साधारणपणे प्रोसेस्ड फूड मध्ये ग्लूटन जास्त असतं. ब्रेड, पिझ्झा, पास्ता, ब्रेडक्रम्स, नूडल्स, व्हेजी बर्गर, पेस्ट्री, कुकीज यात ग्लूटेन असतं. गहू, जव, गव्हाचा रवा, सोया सॉस, बीयर, फ्लेवर्ड चिप्स, काही सॅलड ड्रेसिंग, काही मिक्स मसाले. काही प्रकारच्या वाईन मध्येही ग्लूटेन असतं.

ग्लूटेन फ्री फूड
संशोधकांच्यामते, ग्लूटेन फ्री डाएट ग्लूटेनयुक्त पदार्थांच्या तुलनेत चांगले असतात. यात जास्त प्रमाणात आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड आणि इतर पोषक घटक असतात. कमी फायबर, साखर जास्त असते.

Web Title: What exactly is gluten? why is it allergenic? understand everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.