लवकर वजन कमी करण्यासाठीचा 'फास्ट ८०० डाएट' प्लॅन काय आहे? जाणून घ्या फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:44 AM2019-10-16T10:44:15+5:302019-10-16T10:44:19+5:30

वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅनमध्ये कॅलरी काउंट करून खाणं सर्वात चांगली पद्धत आहे. डाएटमध्ये कॅलरी काउंटवर लक्ष ठेवल्याने वजन कमी करण्यासोबतच पोषक तत्वांवर देखील लक्ष राहतं.

What is fast 800 diet plan know benefits and precautions | लवकर वजन कमी करण्यासाठीचा 'फास्ट ८०० डाएट' प्लॅन काय आहे? जाणून घ्या फायदे...

लवकर वजन कमी करण्यासाठीचा 'फास्ट ८०० डाएट' प्लॅन काय आहे? जाणून घ्या फायदे...

Next

वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅनमध्ये कॅलरी काउंट करून खाणं सर्वात चांगली पद्धत आहे. डाएटमध्ये कॅलरी काउंटवर लक्ष ठेवल्याने वजन कमी करण्यासोबतच पोषक तत्वांवर देखील लक्ष राहतं. वजन कमी करण्यात मुख्य भूमिका कॅलरीची असते. कॅलरी काउंट असलेल्या डाएट चार्टचा  सर्वात मोठा फायदा हा होतो की, तुम्ही कोणते पोषक तत्व आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घेत आहात. तसेच कॅलरी काउंटने तुम्हाला हे माहीत असतं की, तुमच्या दुसऱ्या दिवसाच्या डाएटमध्ये किती कॅलरी होत्या आणि तुम्ही किती खर्च केल्या. अशात वजन कमी करण्यासाठी फास्ट ८०० डाएट प्लॅन चर्चेचा विषय ठरत आहे.

फास्ट ८०० डाएट प्लॅन

कॅलरी काउंटवर आधारित एक विशेष डाएट प्लॅन सध्या चर्चेचा विषय ठरत आह. फास्ट ८०० डाएट प्लॅन या नावाने हा डाएट प्लॅन ओळखला जातो. फास्ट ८०० डाएट प्लॅन त्याच्या नावानुसारच ८०० कॅलरी असलेला डाएट चार्ट असतो. याबाबत डाएट एक्सपर्ट मानतात की, योग्य पद्धतीने केला गेला तर हा सर्वात चांगला वेट लॉस डाएट प्लॅन ठरू शकतो.

हा एकप्रकारचा इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन आहे. काही डाएट एक्सपर्ट याला मेडिटेरियन डाएट प्लॅन असंही म्हणतात. लो कॅलरी डाएट प्लॅनवर आधारित हा वेट लॉस डाएट प्लॅन कुणीही करू शकतो. हा डाएट प्लॅन २ आठवड्यांपासून ते १२ आठवडे केला जाऊ शकतो. फास्ट ८०० लो-कॅलरी डाएट प्लॅनमध्ये लो कॅलरी फूडचा समावेश तर असतोच, पण पोषक तत्व असलेले भरपूर पदार्थही असतात. याला हेल्दी डाएटही म्हटलं जातं. 

फास्ट ८०० लो-कॅलरी डाएट प्लॅनमध्ये शुगर, लो स्टार्च आणि विना तेलाच्या पदार्थांचा समावेश केला जातो. त्यामुळेच या डाएट प्लॅनने लवकर वजन कमी होतं असं मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी या डाएट प्लॅनमध्ये ड्राय फ्रूट्स, बीया, फळं, भाज्या, दही, डाळी आणि ऑलिव्ह ऑइलचा समावेश केला जातो.

डाएट प्लॅनसोबत एक्सरसाइज

जर तुम्ही लो-कॅलरी डाएट प्लॅन घेत असाल तर तुम्हाला हेही माहीत असलं पाहिजे की, तुमच्यासाठी कोणती एक्सरसाइज गरजेची आहे. डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट्सनुसार, हा डाएट प्लॅन हाय इटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, योगा यांसारख्या एक्सरसाइजने चांगला रिझल्ट मिळू शकतो.

काय काळजी घ्यावी?

वजन कमी करण्यासाठी कोणताही डाएट प्लॅन योग्य पद्धतीने नियमित आणि संयमपणे फॉलो केला पाहिजे.  फास्ट ८०० कॅलरी डाएट प्लॅनमध्ये आपल्या आहारावर नजर ठेवण्याची गरज असते. दिवसभरात अनहेल्दी फूड किंवा स्नॅक्स खाणं टाळलं पाहिजे. संपूर्ण दिवसात ८०० पेक्षा जास्त कॅलरी खाऊ नये. 

(टिप : वरील लेखात देण्यात आलेली डाएट प्लॅनची माहिती ही केवळ तुमच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन फॉलो करायचा असेल तर आधी एक्सपर्ट्सचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्याशिवाय हा डाएट प्लॅन फॉलो कराल तर तुम्हाला वेगळी समस्याही होऊ शकते.) 


Web Title: What is fast 800 diet plan know benefits and precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.