फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी काय खावं? जाणून घ्या काही सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:45 AM2024-07-26T11:45:02+5:302024-07-26T11:45:43+5:30

Foods to reverse Fatty Liver: Fatty Liver ची समस्या दूर करण्यासाठी काही फूड्सची मदत मिळू शकते. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

What foods help prevent and reverse fatty liver? | फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी काय खावं? जाणून घ्या काही सोपे उपाय!

फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी काय खावं? जाणून घ्या काही सोपे उपाय!

Foods to reverse Fatty Liver: आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत आहेत. यात सगळ्यात कॉमन लिव्हरवर सूज येणं ही समस्या आहे. लिव्हरवर फॅट जमा होणे हेही एक गंभीर समस्या आहे. खराब लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं आणि अधिक मद्यसेवन करणं ही यामागची कारणे आहेत. दारू न पिता लिव्हरवर सूज येत असेल तर याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हटलं जातं. Fatty Liver ची समस्या दूर करण्यासाठी काही फूड्सची मदत मिळू शकते. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

पपई

पपईचं सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते. पपईमध्ये पॅपीन नावाचं महत्वाचं तत्व असतं जे पचन तंत्र चांगलं ठेवतं. पपई लिव्हरसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण या अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे लिव्हरला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. सोबतच पपई लिव्हर डिटॉक्स करण्यासही मदत करतात. याने फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

ब्रोकली

ब्रोकलीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. यात सल्फोफेन, फायबर, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए भरपूर असतात. जे अनेक आजारांपासून आपला बचाव करण्यास मदत करतात. तसेच ब्रोकलीचं सेवन केल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर होण्यासही मदत मिळते.

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. जे हेल्दी फॅट मानलं जातं. फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी याचं सेवन करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात अक्रोडचा समावेश करा.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर सोबतच भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे लिव्हरसाठी फायदेशीर असतात. फायबर हे पचनक्रियेसाठी फार महत्वाचं असतं. ज्यामुळे अन्न लवकर पचन होतं. त्यामुळे लिव्हरवर जास्तीचा दबाव पडत नाही आणि फॅटी लिव्हर ठीक करण्यास मदत मिळते.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी फॅट असतं. सोबतच यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. जे फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. याने लिव्हरवरील सूजही कमी होते. त्यामुले ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश करा.

लसूण

लसणाच्या मदतीने तुम्ही शरीरात लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढू शकता. सोबतच यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात जे लिव्हरवरील सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या असेल तर नियमितपणे लसणाचं सेवन करा.

Web Title: What foods help prevent and reverse fatty liver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.