काय आहे फॉरेस्ट थेरपी? काय होतात याने शरीराला फायदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 10:59 AM2018-08-17T10:59:33+5:302018-08-17T11:00:13+5:30
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या थेरपींचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात फॉरेस्ट थेरपीताही समावेश आहे. अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतं.
(Image Credit : www.theresiliencyinstitute.net)
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या थेरपींचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात फॉरेस्ट थेरपीताही समावेश आहे. अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतो. पण याने केवळ आपल्याला आनंदच नाही तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
फॉरेस्ट थेरपी ही अशीच एक प्रथा आहे जी आपल्या मेंदुसाठी आणि शरीरासाठी लाभदायक आहे. ही थेरपी त्या लोकांसाठी अधिक फायदेशीर मानली जाते जे लोक चिंता आणि तणावग्रस्त आहेत. फॉरेस्ट थेरपीची अनोखी प्रॅक्टिस जपानमध्ये सुरु झाली होती. आणि याला जपानी भाषेत शिन्रीन-योकू म्हटले जाते.
हा मनोरंजक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जंगलात आराम करण्यासाठी जावं लागतं. मानसोपचारतज्ज्ञ स्कॉट बीए म्हणतात की, ही थेरपी सुरु करण्याचा उद्देश लोकांना नैसर्गिक गोष्टींकडे आकर्षित करणे हा आहे. जंगलातील ठिकाणे, ध्वनी आणि सुगंध तुम्हाला अशा वातावरणात घेऊन जातात जिथे तुम्ही अंदाज लावणे, आठवण करणे, चिंता करणे बंद करता.
आरोग्यासाठी कशी फायदेशीर
असे म्हणतात की, जंगलातील शांततेमुळे आणि वेगवेगळ्या ध्वनींमुळे व्यक्तीला आराम जाणवतो. फॉरेस्ट थेरपी केवळ तुमचं डोकंच नाही तर शरीरालाही आराम देते. एका अभ्यासातून समोर आले आहे की, फॉरेस्ट थेरपी कोर्टिसोल या तणाव निर्माण करणाऱ्या होर्मोनला कमी करतो. तसेच या थेरपीने रक्तप्रवाह आणि एटीपोनेक्टिनवर सकारात्मक प्रभाव होतो. इतकेच नाही तर ब्लडमध्ये शुगरही याने नियंत्रण ठेवलं जातं.
आणखी काय फायदे
१) ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फॉरेस्ट थेरपी खूप फायदेशीर मानली जाते. याने रक्तप्रवाह सामान्य होतो.
२) जंगलात आंघोळ करण्याचा सकारात्मक भावनांमध्ये वाढ होते आणि नकारात्मक भावना कमी होतात. मन शांत आणि मोकळं होतं. याने चिंता, डिप्रेशन आणि तणाव कमी होतो.
३) फॉरेस्ट थेरपीने ग्लूकोजचं प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही थेरपी फायदेशीर मानली जाते.
४) वजन वाढलेले लोक जर रोज अर्धा तास फॉरेस्ट थेरपी घेतील तर त्यांना कॅलरी बर्न करण्यास मदत होईल.