एक महिना बटाटे खाल्लेच नाही तर काय होईल? जाणून घ्या शरीरावर पडणारा प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:18 AM2024-10-24T10:18:18+5:302024-10-24T10:26:13+5:30

What Happens If You Give Up Potatoes For A Month: लहान असो वा मोठे सगळ्यांना बटाटे खाणं आवडतं. पण जर समजा एक महिना बटाट्यांचं सेवन केलं नाही तर काय होईल? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

What Happens If You Give Up Potatoes For A Month | एक महिना बटाटे खाल्लेच नाही तर काय होईल? जाणून घ्या शरीरावर पडणारा प्रभाव!

एक महिना बटाटे खाल्लेच नाही तर काय होईल? जाणून घ्या शरीरावर पडणारा प्रभाव!

What Happens If You Give Up Potatoes For A Month: भारतीय घरांमध्ये जवळपास रोज बटाट्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केलं जातं. कधी भाजी, कधी पराठे, कधी वडे तर कधी बटाटे भजी खाल्ली जातात. बटाट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लहान असो वा मोठे सगळ्यांना बटाटे खाणं आवडतं. पण जर समजा एक महिना बटाट्यांचं सेवन केलं नाही तर काय होईल? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक महिना बटाटे न खाण्याचा प्रभाव

1) पोषक तत्व मिळणार नाहीत

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फायबर आणि अनेक मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही एक महिना बटाटे खाल्ले नाही तर हे न्यूट्रिएंट्स कमी होऊ शकतात. मात्र, दुसऱ्या पदार्थांमधून तुम्हाला हे पोषक तत्व मिळू शकतात.

2) इम्यून सिस्टीमवर प्रभाव

बटाट्यांमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते. जर एक महिना तुम्ही बटाट्यांचं सेवन केलं नाही तर इम्यून सिस्टीम कमजोर होतं. ज्यामुळे तुम्हाला सतत सर्दी, खोकला आणि ताप अशा समस्या होऊ शकतात. जर व्हिटॅमिन सी चे स्त्रोत जसे की, संत्री आणि लिंबाचं सेवन केलं तर ही समस्या होणार नाही.

3) डायजेशनवर प्रभाव

बटाट्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे पचन तंत्रासाठी गरजेचं असतं. जर तुम्ही हे खात नसाल तर तुमच्या डायजेशन सिस्टीमवर वाईट प्रभाव पडतो. तसेच बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्या होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी फायबर असलेल्या फूडचं सेवन करावं.

4) ब्लड शुगर राहील कंट्रोल

बटाट्यांमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे. सामान्यपणे ज्या पद्धतीने आपल्याकडे बटाटे शिजवले जातात त्याने ग्लूकोज लेव्हल अचानक वाढते. अशात एक महिना बटाट्यांचं सेवन टाळलं तर डायबिटीसच्या रूग्णांना फायदा मिळू शकतो.

Web Title: What Happens If You Give Up Potatoes For A Month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.