Coronavirus : जर कुणी कोरोना व्हायरसच्या २ व्हेरिएंटने एकाचवेळी संक्रमित झाले तर काय होतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 01:11 PM2021-07-14T13:11:44+5:302021-07-14T13:12:05+5:30
इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितलं की, एकच व्यक्ती एकाचवेळी दोन व्हेरिएंटने संक्रमित असल्याच्या केसेस कमीच बघायला मिळतात.
बेल्जिअमच्या एका ९० वर्षीय महिला पहिली अशी व्यक्ती आहे, ज्यांना एकाच वेळी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दोन व्हेरिएंटने (Corona virus Variant) संक्रमित केलं आहे. ही महिला यावर्षी मार्चमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित झाली होती आणि तिच्यात अल्फा व बीटा दोन्ही व्हेरिएंट आढळून आले होते. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार क्लीनिकल मायक्रोबायोलॉजी आणि संक्रमित आजारांवर झालेल्या वार्षिक यूरोपिअन कॉंग्रेसमध्ये या अनोख्या केसवर चर्चा झाली.
इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितलं की, एकच व्यक्ती एकाचवेळी दोन व्हेरिएंटने संक्रमित असल्याच्या केसेस कमीच बघायला मिळतात. पण असं होणं जराही हैराण करणारं नाहीये. थोड्याच काळात अनेक लोकांकडून संक्रमित होणे ना अशक्य आहे आणि ना ही अशी बाब आहे जी पहिल्यांदा ऐकली.
जर एखादी व्यक्ती एकाच वेळी अनेक संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आली तर ती व्यक्ती एका व्यक्तीकडून किंवा सर्वांकडून संक्रमित होऊ शकते. व्हायरस शरीराच्या आत वाढण्यास वेळ लागतो आणि सर्व कोशिकांवर प्रभाव टाकतो. जोपर्यंत असं होतं तोपर्यंत ज्या कोशिका संक्रमित झाल्या नाहीत त्यावर दुसऱ्या स्त्रोतातून येणाऱ्या व्हायरसने संक्रमण होऊ शकतं. पॅथोजन विरोधात इम्यूनिटीला लढण्यासही वेळ लागतो. या दरम्यान या गोष्टीची शक्यता असते की, व्यक्ती एका व्यक्तीककडून किंवा जास्त लोकांकडून संक्रमित होईल. दोनदा संक्रमण एचआयव्हीच्या रूग्णांमध्ये सामान्य बाब आहे.
अशा केसेस समोर येण्याची शक्यता कमीच राहते. कारण प्रत्येक वेळी लोकांना भेटल्यावरच संक्रमण व्हावं हे गरजेचं नाही. संक्रमित व्यक्तीच्या कुणी संपर्कात आलं तर तो व्यक्ती संक्रमित होईलच असंही नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती एका व्यक्तीला किंवा अनेक संक्रमित लोकांना थोड्या वेळाने भेटली आणि सर्वातील व्हायरस त्याला संक्रमित करेल याची शक्यता कमीच राहते.
बेल्जिअमची महिला अशी पहिली महिला आहे जिच्यात असं लक्षण आढळून आलं. पण असंही होऊ शकतं की, जगात अशा अनेक केसेस असतील किंवा आता अशा केसेस समोर येत असतील. पण याची माहिती मिळणं कठीण असतं. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा व्यक्तीतील व्हायरस सॅम्पलचं जीनोम टेस्ट केली जाईल.
घाबरण्याची गरज नाही
एकत्र संक्रमणाचा रूग्णाच्या स्थितीवर वेगळा काही प्रभाव पडत नाही. भलेही व्हेरिएंट वेगळे असतील. सगळे व्हायरस रूग्णाच्या आरोग्यावर एकसारखा प्रभाव टाकतात. त्यामुळे याचा काही फरक पडत नाही की व्हेरिएंट एका स्त्रोताचा आहे की, अनेक.