दुसऱ्यांसोबत बसून एकत्र जेवण केल्याने काय होतं? हार्वर्डच्या डॉक्टरांनी सांगितले फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:29 AM2024-11-08T11:29:55+5:302024-11-08T11:39:06+5:30
ब्रूक्स यांना आढळलं की, खाण्याचा आनंद घेणं हे यावर जास्त अवलंबून असतं की, आपण कसे खात आहोत. आपण काय खातो यावर नसतं.
पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने घरातील सगळे लोक किमान एक वेळा तरी सोबत बसून जेवण करत असे. मात्र, आजकालच्या धावपळीच्या जीवनात, कामाच्या वाढलेल्या वेळात घरातील सदस्यांनी एकत्र बसून जेवणं शक्य होत नाही. मात्र, एकत्र बसून जेवण केल्याने काय काय फायदे होतात याबाबत नुकताच एक दावा समोर आला आहे.
हॅप्पीनेस एक्सपर्ट आर्थर सी. ब्रूक्स यांनी 'द एटलांटिक' मधील एका लेखात सांगितलं की, आनंदासाठी काय खाल्लं पाहिजे. याचं काही एक उत्तर नाही. हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. त्यांनी सांगितलं की, आवडते पदार्थ खाल्ल्याने मेंदुचे असे काही भाग अॅक्टिव होतात, जे आनंद देतात. मात्र, हे तोपर्यंत तुम्ही ते खात आहात.
हा आनंद नेहमीसाठी कायम ठेवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. अशात ब्रूक्स यांना आढळलं की, खाण्याचा आनंद घेणं हे यावर जास्त अवलंबून असतं की, आपण कसे खात आहोत. आपण काय खातो यावर नसतं.
आशियामध्ये करण्यात आलेल्या ८ वर्षाच्या रिसर्चनुसार, दुसऱ्यासोबत बसून जेवण केल्याने नेहमी लक्षात राहील असा आनंद मिळतो. याच्या तुलनेत एकटं बसून जेवण करणं इमोशनली हेल्दी नाही.
एकत्र बसून खाण्याचे फायदे
हार्वर्ड टी.एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर डॉ. फ्रॅंक बी. हू यांनी सीएनबीसीला सांगितलं की, जेवण आणि सोशल कनेक्शन नॅचरल आहे. एकत्र बसून जेवण केल्याने शरीराला पोषण तर मिळतंच, सोबतच आपली आत्म्यालाही पोषण मिळतं.
आनंदासाठी सोबत बसून जेवा
ब्रूक्स यांचं मत आहे की, आनंदी राहण्यासाठी कोणतीही स्पेशल डाएट नाही. जर तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर रोज आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत आनंदाने जेवण करा. याने तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. जो एकट्याने जेवणात मिळत नाही.
कारण जेवण केवळ शरीरासाठीच नाही तर आनंद आणि संबंधांसाठीही महत्वाचं आहे. योग्यपणे जेवण केल्याने आणि दुसऱ्यांसोबत मिळून जेवल्याने आरोग्य तर चांगलं राहतंच, सोबतच आनंदातही भर पडते.
आहारात वेगळेपणा
आहारात वेगळेपणा असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांसोबत मिळून प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि कमी कार्ब्स असलेले पदार्थ खाता तेव्हा याचा आरोग्यावर लवकर प्रभाव पडतो.
तुमचं आणि जवळच्या लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात रिफाइंड मिठाई आणि जंक फूड्सचा समावेश करू नका. सोबतच मद्यसेवन टाळा किंवा फार कमी प्रमाणात करा. आहारात हेल्दी फूड्सचा समावेश करा.