लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल लगेच खाणं सुरू कराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:50 PM2024-11-12T12:50:07+5:302024-11-12T12:52:15+5:30
Garlic With Ghee Health Benefits: आयुर्वेदातही लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. अशात जर तुम्ही लसूण आणि तूपाचं एकत्र सेवन कराल तर याचे फायदे दुप्पट होतात.
Garlic With Ghee Health Benefits: भारतीय किचनमध्ये लसणाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. लसणाने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या दूर करण्यात लसूण महत्वाची भूमिका बजावतो. आयुर्वेदातही लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. अशात जर तुम्ही लसूण आणि तूपाचं एकत्र सेवन कराल तर याचे फायदे दुप्पट होतात.
लसणाचा वापर औषधी म्हणूनही खूप आधीपासून केला जातो. यात एलिसिन नावाचं तत्व असतं, ज्यात अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-वायरल गुण असतात. त्यासोबतच लसणामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅगनीज, सेलनियम, कॅल्शिअम, आयर्न, फॉस्फोरस आणि फायबरही असतं.
लसणाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. कच्चा किंवा भाजूनही खाऊ शकता. पण अनेकांना हे माहीत नाही की, लसूण जर तुपात भाजून खाल्ला तर अनेक गंभीर समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.
तूप आणि लसणाचं कसं कराल सेवन?
आयुर्वेदात तर तूप आणि लसणाच्या एकत्र सेवनाला खूप महत्व आहे. याचं सेवन करण्यासाठी रात्री लसूण सोलून ठेवा आणि सकाळी तुपात फ्राय करून याचं सेवन करा. तुपात फ्राय केल्यावर याची टेस्ट आणि गुणधर्म दोन्ही बदलतात. चला जाणून घेऊ यांचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे मिळतात.
स्ट्रोकचा धोका कमी होतो
लसूण तुपात फ्राय करून सेवन केल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यासोबतच याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
इम्यूनिटी बूस्ट होते
जे लोक नेहमीच आजारी पडतात किंवा ज्यांना सतत सर्दी-खोकला होत असेल त्यांची इम्यूनिटी कमजोर असते. अशात ज्यांची इम्यूनिटी कमजोर आहे त्यांनी रोज तुपात फ्राय केलेल्या लसणाचं सेवन केलं पाहिजे. याने इम्यूनिटी बूस्ट होते.
ऑटो इम्यून डिजीजपासून बचाव
लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्यास ऑटो इम्यून डिजीज जसे की, संधिवात, ल्यूपस, मल्टीपल स्केलेरोसिस आणि क्रॉनिक सूज समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो.
बॉडी डिटॉक्स
लसणांमध्ये असे अनेक पोषक तत्व जसे की, एलिसिन आणि सॅपोनिन आढळतात. जे अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. या तत्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते.