लघवी जास्तवेळ रोखून ठेवल्याने काय होतं? नुकसान वाचाल तर कधीच असं करणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:50 AM2022-07-16T10:50:12+5:302022-07-16T10:50:58+5:30
Holding Pee Side Effects: तुम्हीही असं काही करत असाल तर हे फार धोकादायक ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्टनुसार, लघवी रोखून ठेवल्याने तुमच्या आरोग्याचं नुकसान होतं.
Holding Pee Side Effects: बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकांना लघवी रोखून ठेवावी लागते. अनेकदा लोक कामात बिझी असल्याने लघवी रोखून ठेवतात. तेच काही लोक आळसामुळे लघवीला जात नाहीत. तुम्हीही असं काही करत असाल तर हे फार धोकादायक ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्टनुसार, लघवी रोखून ठेवल्याने तुमच्या आरोग्याचं नुकसान होतं.
Kegal8 चे फाउंडर आणि हेल्थ गुरू स्टेफनी टेलर म्हणाले की, ब्लॅडर फुल झाल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. ते म्हणाले की, लघवी फार जास्त वेळ रोखून ठेवल्याने तुमचा पेल्विक फ्लोर डॅमेज होऊ शकतो.
स्टेफनी म्हणाले की, लघवी फार जास्त वेळ रोखून ठेवल्याने ब्लॅडरमध्ये असलेले मसल्स गरज असेल तेव्हा योग्य क्रिया करण्याची क्षमता गमावतं. यामुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामं होत नाही. लघवी रोखून ठेवल्याने तुम्ही अनेकदा इच्छा असूनही लघवी पास करू शकत नाहीत. इतकंच नाही तर लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने अनेकदा ड्रायनेसच्या समस्येचा सामना करण्यासोबतच लघवी पास होण्याची समस्या देखील होऊ शकते.
एका आवरेज अॅडल्टचं ब्लॅडर 2 कप लघवी रोखून ठेवू शकतं. जेव्हा ते एक चतुर्थांश भरतं तेव्हा ते तुमच्या मेंदूला एक संदेश पाठवतं. जेव्हा तुम्ही लघवी जास्त वेळ रोखून ठेवली तर याने खतरनाक बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात, ज्यामुळे तुम्हाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. यूटीआय फार वेदनादायी असतं आणि यात लघवी पास करताना फार वेदना होतात. जर यूटीआयवर वेळीच उपचार केले नाही तर आणि बॅक्टेरिया पसरले तर ही समस्या सेप्सिसमध्ये बदलते.
स्टेफनीने सांगितलं की, असे अनेक संकेत आहेत ज्यातून तुम्ही याची माहिती मिळवू शकता की, तुमचं पेल्विक फ्लोर व्यवस्थित काम करत नाहीये. यात खोकताना किंवा शिंकताना यूरिक लिक होणं आणि पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं यांचा समावेश आहे.
तुम्हाला पेल्विक एरियात आणि सेक्स दरम्यान वेदना जाणवू शकते. मलत्याग करताना होणारी वेदनाही याकडे इशारा करते की, तुमच्या पेल्विक फ्लोर कमजोर आहे.
काय आहे उपाय?
स्टेफनी यांनी सांगितलं की, पुढे ही समस्या वाढू नये म्हणून काही उपाय करू शकता. स्टेफनी म्हणाले की, लोक पार्टीमध्ये दारूचं सेवन करतात. ज्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी येते. त्यासोबतच दारूच्या सेवनाने तुमचं ब्लॅडरही डिस्टर्ब होतं. अशात गरज आहे की, तुम्ही कमी प्रमाणात दारूचं सेवन करा.