आपल्या आनंदाच्या डब्यात आपण काय भरलंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:43 PM2017-10-02T14:43:15+5:302017-10-02T14:44:15+5:30

पॉझिटिव्ह एनर्जीनं तो भरलेला असेल, तर इतर निगेटिव्ह गोष्टींना त्यात थाराच राहाणार नाही..

 What have you filled in your happiness box? | आपल्या आनंदाच्या डब्यात आपण काय भरलंय?

आपल्या आनंदाच्या डब्यात आपण काय भरलंय?

ठळक मुद्देभूतकाळात आणि भविष्यकाळात रमण्यापेक्षा आपलं वर्तमान समृद्ध करा.जगाची चिंता सोडा. बघा फक्त आपल्याकडे. बघा आपल्या श्वासाकडे. प्रत्येक श्वासागणिक आपलं पोट कसं खालीवर होतं ते. श्वासाचा आवाज ऐका..तुम्हाला कुठे जायचं आहे, त्यावर फोकस करण्यापेक्षा वर्तमान क्षणी आपण काय करतो आहोत, ते आपल्या संवेदनांनी अनुभवा..

- मयूर पठाडे

कसं राहायचं आनंदी? कसं ठेवायचं आपलं मन शांत?.. कसं जगायचं स्वत:साठी?.. रोजची तीच कामं करतानाही, त्याच टेन्शन्सना सामोरं जातानाही या गोष्टींना कसं ठेवायचं चार हात दूर?..
त्यासाठीचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे वर्तमानात जगायचं, त्या त्या क्षणाचा मन:पूत आनंद घेताना इतर निगेटिव्ह गोष्टींना आपल्यापासून दूरच ठेवायचं..
सहज जमेल ते..
साधी गोष्ट आहे. समजा तुमच्याकडे एखादा डबा आहे.. जेवणाचा समजा. त्यात जेवढी जागा आहे, तेवढंच आपण त्यात भरू शकतो. समजा पोळी, भाजी, भात, वरण, आमटी.. त्यात जे काही भरायचं ते आपण भरलं की इतर गोष्टींसाठी त्यात जागा राहाणार नाही.
आपल्या आनंदाचंही तसंच आहे. आपल्याजवळ असलेला आपला डबा आनंदानं, पॉझिटिव्ह एनर्जीनं भरायचा.. एकदा का डबा भरला की मग इतर निगेटिव्ह गोष्टींसाठी त्यात जागाच राहाणार नाही.
जगातल्या साºयाच मानसशास्त्रज्ञांचा हाच सल्ला आहे. चांगल्या गोष्टींनी आपला डबा कायम भरलेला ठेवा. त्यात थोडीशी जरी जागा आपण रिकामी ठेवली, तर निगेटिव्ह गोष्टी ती जागा भरून काढणारच.
कसं करायचं हे?
भूतकाळात आणि भविष्यकाळात रमण्यापेक्षा प्रत्येकानं आपल्या वर्तमानावर लक्ष द्यायला हवं.
जगाची चिंता सोडा. बघा फक्त आपल्याकडे. बघा आपल्या श्वासाकडे. आपल्या पोटाकडे. प्रत्येक श्वासागणिक आपलं पोट कसं खालीवर होतं, श्वासाचा आवाज ऐका..
समजा जेवतो आहोत आपण. त्याकडेच फक्त लक्ष द्या. त्या अन्नाचा रंग पाहा. त्याचं टेक्स्चर हाताला जाणवू द्या. घ्या त्या अन्नाचा सुगंध.. त्याची चव..
चालताना प्रत्येक पावलाकडे लक्ष द्या. आपलं वजन कसं दुसरीकडे शिफ्ट होतंय, त्याचा अनुभव घ्या. पावलांना त्याचं सेन्सेशन जाणवू द्या..
तुम्हाला कुठे जायचं आहे, त्यावर फोकस करण्यापेक्षा वर्तमान क्षणी आपण काय करतो आहोत, ते आपल्या साºया संवेदनांनी अनुभवा.. बघा, आपल्यात काय परिवर्तन होतं ते..


 

Web Title:  What have you filled in your happiness box?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.