विल स्मिथची पत्नी जेडा स्मिथ हिला नेमका कोणता आजार आहे? ऑस्करमधील घटनेमुळे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:25 PM2022-03-29T16:25:55+5:302022-03-29T16:26:06+5:30
जेडानं हौस म्हणून किंवा एखाद्या चित्रपटासाठी टक्कल केलेलं नसून एका आजारामुळे तिची ही अवस्था झालेली आहे. जेडा स्मिथ सध्या अॅलोपेसिया (Alopecia) नावाच्या आजारानं त्रस्त आहे. Auto Immune प्रकारचा हा आजार आहे.
या वर्षीचे अॅकॅडमी अवॉर्ड्स (Oscars 2022) एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. अभिनेता विल स्मिथनं ऑस्कर वितरण सोहळ्यामध्ये कॉमेडियन क्रिस रॉकवर(Chris Rock) थेट स्टेजवर जाऊन हात उचलून खळबळ उडवून दिली. त्याचा VIDEO VIRAL झाला. यामागचं कारण होतं क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोवर केलेला विनोद. काय आहे हे नेमकं प्रकरण?
क्रिसनं विलची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची (Jada Pinkett Smith) खिल्ली उडवली होती. जेडा पिंकेट ही ख्रिस विलची बायको. तीसुद्धा अभिनेत्री आहे.पण काही काळापासून तिचे केस मोठ्या प्रमाणावर गळत आहेत. आता तर डोक्यावरील सर्व केस नाहीसे झालेले आहेत. या कारणावर क्रिसनं तिची खिल्ली उडवली. विल स्मिथला ही गोष्ट आवडली नाही. त्यानं स्टेजवरच क्रिसवर हात उचलला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींपासून ते टीव्ही प्रेक्षक आणि खुद्द क्रिस रॉकदेखील विल स्मिथच्या या वागण्यामुळे घाबरला.
जेडानं हौस म्हणून किंवा एखाद्या चित्रपटासाठी टक्कल केलेलं नसून एका आजारामुळे तिची ही अवस्था झालेली आहे. जेडा स्मिथ सध्या अॅलोपेसिया (Alopecia) नावाच्या आजारानं त्रस्त आहे. Auto Immune प्रकारचा हा आजार आहे.
अॅलोपेसिया किंवा अॅलोपेसिया अरेटा (Alopecia Areata) ही एक कॉमन ऑटोइम्युन कंडिशन आहे. जगभरातील अनेक लोक या आजारानं त्रस्त आहेत. यामध्ये रुग्णाच्या डोक्यावरील केस मोठ्या प्रमाणात गळतात. तज्ज्ञांच्या मते, अॅलोपेसिया असलेल्या काही व्यक्तींच्या फक्त डोक्यावरीलच सर्व केस गळतात (Hair Fall) तर काही लोकांच्या संपूर्ण शरीरावरील केस गळतात. अॅलोपेसिया अरेटा कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो. पण, ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना याचा धोका जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा आजार खूप लवकर वाढतो आणि काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात केसगळती होते. अॅलोपेसियानंग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एखाद्या सदस्यालाही हा आजार असतो. मानसिक तणावामुळे हा आजार होत असल्याचं म्हटलं जातं. परंतु, त्याबाबत अद्याप ठोस वैज्ञानिक पुरावे (Scientific Evidence) मिळालेले नाहीत. या आजारासाठी डॉक्टर कॉर्टिकोस्टेरॉईड्ससारखे (Corticosteroids) उपचार देतात.
५० वर्षीय जेडा पिंकेट स्मिथ अनेक वर्षांपासून अॅलोपेसियामुळे त्रस्त आहे. २०१८ मध्ये रेड टेबल टॉक सीरिजमध्ये तिन याबद्दल पहिल्यांदा खुलासा केला होता. ती म्हणाली होती, 'अनेक लोक मला विचारत आहेत की मी आजकाल डोक्याला स्कार्फ किंवा कापड बांधून का फिरते. मी आजपर्यंत याबद्दल बोललेले नाही. पण, आता मी त्याबद्दल सांगणार आहे. जेव्हा या आजाराचं निदान झालं होतं तेव्हा मी खूप घाबरले होते.' एकदा आंघोळ करत असताना तिचे जवळपास मूठभर केस हातात आले. या प्रकारानं ती घाबरली. आपल्याला टक्कल पडतं की काय? अशी भीतीही तिला वाटली होती. त्यानंतर ती सातत्यानं केस कापत आली, असंही जेडानं सांगितलं होतं.
२०२१ मध्ये, जेडा स्मिथनं इन्स्टाग्रामवर (Instagram) स्वतःचा एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. यामध्ये तिने लोपेसियाशी लढण्याचा कसा प्रयत्न केला, याबाबत सांगितलं होतं. तिच्या टाळूवर एक रेघ तयार झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. केसगळतीच्या समस्येसाठी स्टेरॉईड इंजेक्शनदेखील (Steroid Injections) घेत असल्याचा खुलासा तिनं केला होता. इंजेक्शनमुळे आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी थोडीफार मदत मात्र नक्कीच होत असल्याचं तिनं सांगितलं होतं. आपल्या पत्नीच्या आजारपणाची क्रिस रॉकनं जाहीरपणे उडवलेली खिल्ली विल स्मिथला रुचली नाही म्हणून त्यानं ऑस्करच्या स्टेजवर क्रिसला मारहाण केली असावी.